Breaking News

पेठ बीड भागातील तीस तरूणांनी केले रक्तदान

बीड :  सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने प्रत्येक जिल्ह्यात रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात आलेले आहे. बीड जिल्हा रूग्णालयातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. त्यातच 18 ते 45 वयोगटातील तरूणांना लस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. लस घेण्यापूर्वी जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करायला हवे. पेठ बीड भागातील तरूणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. काल सोमवार रोजी तीस तरूणांनी हिरालाल चौक याठिकाणी रक्तदान केले. इतर तरूणांनीही अशाच पध्दतीने आदर्श घेवून रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
गेल्या दिड वर्षापासून देशात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. कोरोनामुळे रक्तदान शिबीरात घट झाल्याने रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. मध्यंतरी राज्य सरकारने रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी रक्तदानही केले. 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील तरूणांना कोविडची लस देण्यात येत आहे. लस घेण्यापूर्वी तरूणांनी रक्तदान करायला हवे. रक्तदान करण्यासाठी पेठ बीड भागातील तरूणांनी पुढाकार घेतला. काल सोमवारी तीस जणांनी हिरालाल चौक येथे रक्तदान करण्यात आले. यावेळी राणा चौव्हाण, किशन चौव्हाण, दिपक चौव्हाण, गिरीष बागडे, सुरेश सोनटक्के, सनी राजपुत, रोहित जाधव, शुभम गुरसाळी यांच्यासह आदिंची उपस्थिती होती. अशाच पध्दतीचा आदर्श इतर तरूणांनी घेवून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे असे आवाहन केले जात आहे. 

No comments