Breaking News

टायगर ग्रुप चे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन


बीड : Covid-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून मागील एक महिन्यापासून टाळेबंदी करण्यात आली आहे covid-19 चा वाढता प्रभाव रोखणे यामागचा प्रशासनाचा उद्देश आहे covid-19 चे सर्व नियमांचे पालन करत टायगर ग्रुप महाराष्ट्राचे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 4 मे रोजी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मास्क वाटप वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच गरजवंत नागरिकांना किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.

टायगर ग्रुप महाराष्ट्राचे अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात टायगर ग्रुप महाराष्ट्राचे सामाजिक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय आहे याचा धागा धरत व्यर्थ खर्चाला फाटा देत मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत राज्य शासनाचे व जिल्हा प्रशासनाचे सर्व नियम पाळत सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सोशल डिस्टन चा पालन करत मास्क वाटप वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच महत्त्वाचे या टाळेबंदी ज्यांचा रोजगार बंद आहे अशा गरजवंतांना उच्च दर्जाचे किराणा किट चे  वाटप करण्यात येणार आहे सदरील सामाजिक उपक्रम टायगर ग्रुप चे मराठवाडा अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणार असल्याची माहिती टायगर ग्रुप चे अविनाश भाऊ जाधव यांनी दिली आहे.

No comments