Breaking News

जिंदगी जगवण्याच्या या यज्ञात स्माईल फाउडेंशनचे रक्त - ए.पी.आय कांगुणे

जनसेवेत स्माईल फाउंडेशन कटिबद्ध राहील - सिए ज्ञानेश्वर खांडे

पिंपळनेर :  एक संवेदनशील तरूण म्हणुन रक्तदान करण हे आपलं सामाजिक दायित्व आहे. रक्तदान हे नि:स्वार्थ भावनेनं केलं पाहिजे. कारण आपल्या एका रक्तदानातून कुणाला तरी जीवनदान मिळणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत स्माईल फाऊडेशनने घेतलेला हा रक्तदान शिबीराचा उपक्रम आदर्श असल्याने उद्घाटक पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक कांगुणे यांनी म्हटले आहे. 

    म्हाळसापूर (ता बीड) छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजण करूण या रक्तदान शिबीराची सुरवात करण्यात आली. यावेळी स्माईल फाउंडेशनचे सदस्य तसेच गावचे सरपंच लहू खांडे, उपसरपंच सुमंत राऊत, नितीन खांडे, पत्रकार गणेश तांबे आदींची यावेळी उपस्थिती होती.

    तरूण युवकांनी रक्तदान करून आपली पुढची व्यवस्था करूण ठेवावी लागेल. कारण पुढील काळ कठीण आहे. पुढील काही महिण्यात रक्ताचा तुतवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे त्यामुळे यासारखी रक्तदान शिबिरे घेणे काळाची गरज असुन यापुढे अशी शिबीर घेतले जाणार असल्याचे प्रतिपादन स्माईल फाउंडेशनचे सिए ज्ञानेश्वर खांडे यांनी केले आहे. 

यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व टीम सह प्रशांत लांडे, सिए ज्ञानेश्वर खांडे, धनंजय गुंदेकर, विष्णू घोडके, सर्जेराव डोईफोडे, सचिन नरनाळे, गणेश इंगोले इ. उपस्थित होते. 


No comments