Breaking News

वासनांध दिराने भावजयीच्या इज्जतीवर घातला घाला


अत्याचाराचा व्हिडीओचाकूचा धाक दाखवून वारंवार केला अत्याचार, पीडितेच्या पतीला नराधमाने दिली जीवे मारण्याची धमकी

केज तालुक्यातील नात्याला काळिमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेने सर्वत्र संताप 

गौतम बचुटे । केज 

उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या अंगणात झोपी गेलेल्या एका महिलेला तिचा नात्याने दिर असलेल्या वासनांध हैवानाने रात्री तिला घराच्या बाजूला ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच चाकूचा धाक दाखवून याबद्दल कुणाला काही सांगितले तर  व्हिडीओ शूटिंग तुझ्या नातेवाईकांना दाखवीन, अशी धमकी देत वारंवार अत्याचार केला. भावजयीच्या इज्जतीवर दिराने घाला घातल्याची ही धक्कादायक घटना केज तालुक्यात उघड झालीय. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात आजही ग्रामीण भागात लोक घराच्या अंगणात झोपता. केज तालुक्यातील एका गावात दि. २८ मेच्या रात्री एक पंचवीस वर्षीय महिला आपल्या घराच्या अंगणात झोपली होती. मात्र नात्याने तिचा वासनांध चुलत दिर तिच्या इजतीवर हैवाना सारखा टप्पून बसला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या हैवानं दिराने तिला  घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. चाकूचा धाक दाखवून घडल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले तर व्हिडीओ शूटिंग तुझ्या नातेवाईकांना दाखवीन, अशी धमकी दिली. त्या नंतर दुसऱ्या दिवशीही दि. २९ मे रोजी त्याने तिच्यावर अत्याचार केला. 

पीडितेला हा प्रकार सहन न झाल्यामुळे तिने आपल्या पतीला आपल्यावर घडलेला अतिप्रसंग सांगितला. दरम्यान पीडित महिलेच्या पतीने त्या नराधमाला जाब विचारला असता पीडितेच्या पतीला त्या नराधमाने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान याप्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात त्या हैवाना विरुद्ध गु.र.नं. २७१/२०२१ भा.दं.वि. ३७६ (२)(एफ), ३७६ (२) (एन), ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मागील दीड महिन्या पासून नात्याने दिर असलेला नराधम हा पिडीत विवाहितेवर वारंवार बलात्कार करीत होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे करीत आहेत.

स.पो.नि. संतोष मिसळेNo comments