Breaking News

केज पोलीस स्टेशनचे मंगेश भोले व त्यांची पत्नी सौ. कोमलताई भोले यांनी पोलीस खात्यांची शान वाढविली ...!


गेवराई जवळील अपघायग्रस्त कुटुंबाला भोले कुटुंबाची मदत !

गौतमबचुटे । केज 

वडीलांच्या अंत्याविधीसाठी  मोटार सायकलने औरंगाबादहून केजकडे येत असलेल्या कुटुंबाचा गेवराई जवळील गढी फाट्या जवळ अपघात झालेला दिसताच त्यातील जखमींना केज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले मंगेश भोले व त्यांची पत्नी सौ. कोमल भोले यांनी मदत करून पोलीस खात्याची शान वाढविली आहे.

या बाबतची माहिती अशी, की, कोरेगाव येथील रामभाऊ शिनगारे यांचे दि. ११ मे रोजी वृद्धापकाळाने दुपारी १२:०० वा. निधन झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच औरंगाबाद येथील रांजणगाव येथे राहत असलेली त्यांची मुलगी सौ. वंदना व जावई व्यंकट सरवदे हे लॉकडाऊन असल्यामुळे गाड्या बंद असल्याने मोटार सायकलवर बसून अंत्यविधीसाठी केज तालुक्यातील कोरेगावकडे येत होते. 

त्यांनी दुपारी ५:०० वा. गेवराई ओलांडून गढी फाट्यावर आले. त्या वेळी मोटार सायकलच्या मागच्या टायरमध्ये खिळा घुसला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पती-पत्नी रस्त्यावर पडले. या अपघातात सौ वंदना सरवदे हिच्या डोक्याला आणि पायाला मार लागला व रक्तस्त्राव झाला. रस्त्याने येणारे लोक हा अपघात पाहून पुढे जात होते. परंतु त्यांच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. एवढ्यात एका अज्ञात व्यक्तिने अपघातग्रस्त सरवदे यांच्या मोबाईलवरून केज येथील त्यांचे पाहुणे पत्रकार गौतम।बचुटे यांना अपघाताची माहिती दिली. त्या नंतर गौतम बचुटे यांनी पप्पू कागदे यांचे कट्टर समर्थक व गेवराईचे रिपाईचे तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर आणि गेवराई पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांच्याशी संपर्क साधून अपघाताची माहीती देऊन मदतीची मागणी केली.


दरम्यान त्याच वेळी केज पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मंगेश भोले हे त्यांची पत्नी सौ. कोमल भोले व मुलांसह औरंगाबादहून केजकडे येत होते. त्यांनी अपघात पहाताच अपघातातील जखमी सौ. वंदना व व्यंकट सरवदे यांना त्यांनी गढी फाट्यावरील डॉ. मुळे यांच्या दवाखान्यात घेऊन जाऊन उपचार केले. तसेच त्यांच्यावर मलपट्टी करून डोक्याच्या जखमेवर टाके घेऊन सलाईन संपेपर्यंत भोले हे दवाखान्यात थांबून त्यांनी जखमींची सेवासुश्रुषा केली. त्यांना दवाखान्यातून सुट्टी होताच त्यांना त्यांच्या स्कार्पिओ गाडीत घेऊन आले आणि त्यांना कोरेगाव येथे आणून सोडले. या घटनेमुळे पोलीस कर्मचारी मंगेश भोले व त्यांची गृहिणी असलेली पत्नी सौ. कोमल भोले यांचे पत्रकार आणि सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गातून कौतुक होत आहे.

" आम्ही अपघात पहिल्या नंतर जखमी कुटुंबाना अगोदर दवाखान्यात नेऊन उपचार केले आणि मी एका पोळीस कर्मचाऱ्यांची पत्नी असल्यामुळे संकटात मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजले. "

              ---- सौ. कोमल मंगेश भोले

" आम्हाला जर भोले कुटुंबांची मदत मिळाली नसती तर लवकर उपचार मिळाले नसते व आम्हाला अंत्यविधीसाठी येता आले नसते. भोले यांची आम्हाला खूप मदत झाली. "

              ---- व्यंकट सरवदे


No comments