Breaking News

पोस्ट कोविड, म्युकर मायकोशीस बाबत मार्गदर्शन शिबिर घेऊन आ.आजबेनी कर्तव्यदक्षता दाखवून दिली- उपसंचालक डाॅ. माले


जनतेमध्ये कोविडमुळे उदभवणाऱ्या आजारांविषयी जागृती होणे गरजेचे - आ. आजबे 

 शिबिरातील मार्गदर्शनात 184 ग्रामपंचायत व,100 हुन अधिक डॉक्टरांनी घेतला सहभाग

आष्टी : कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे मध्ये लोकांना कोविड बाबत जास्त माहिती नव्हती. दुसऱ्या लाटेमध्ये लोकांना कोविडचे चांगलेच परिणाम सहन करावे लागले आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी नागरीकांनी सतर्क राहून स्वतःला व इतरांना कोविडची लागण होण्यापासुन वाचवले पाहिजे. आमदार बाळासाहेब आजबे यांच्या माध्यमातून आज आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायती मधील आरोग्य सेवक सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर व आरोग्य सेवक यांच्यासाठी तिसऱ्या लाटे बाबत , म्यु कर  मायक्रोसिस  व  पोस्ट कोविड कॉम्पिलीकेशन्स बाबत   ऑनलाईन जनजागृती  करण्याचे काम  राज्यात सर्वात अगोदर  हे मार्गदर्शन शिबिर घेऊन  आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे ,यातुन त्यांची  मतदारसंघाबाबत  असणारी काळजी ,व सतर्कता दिसुन येते,त्यामुळे मिच माझा डाॅक्टर म्हणुन हि तिसरी लाट थांबवण्यासाठी  सर्वांनी प्रयत्न करावेत असे अहवान आरोग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले यांनी केले तर कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका ग्रामिण भागातील लोकांना जास्त बसला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये कोविड आणि त्यापासून उदभवणाऱ्या इतर आजारांची अधिक जागृती करणे गरजेचे असल्याचे मत आ. बाळासाहेब आजबे यांनी केले. 

 


   आष्टी येथील बी, डी हंबर्डे काॅलेजवर सार्वजनिक आरोग्य विभाग बीड व आ, बाळासाहेब आजबे मिञ मंडळ, आष्टी विधानसभा मतदार संघा यांच्या वतीने आयोजित केलेल्या पोस्ट कोविड कॉम्प्लीकेशन, म्युकर मायक्रोसीस व तिसऱ्या लाटेत लहान मुलांची घ्यावयाच्या काळजी विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.या शिबिराचा लाभ मतदारसंघातील184 ग्रामपंचायत,व गावातील आरोग्य सेवकांनी व100 हुन अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन लाईव्ह ऐकले, उपसंचालक डॉ,यांनी आ बाळासाहेब आजबे यांचे या उपक्रमाबाबत  कौतुक केले व यापुढेही  असे उपक्रम  राबवले जावेत  असे आयोजकांना  सांगितले. 

यावेळी विभागीय आरोग्य उपसंचालक लातुरचे डाॅ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी  डाॅ. आर. बी. पवार ,उपविभागिय अधिकारी शिंदे, तहसीलदार राजाभाऊ कदम, पाटोदाचे तहसीलदार मुंडलोड, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, माजी जि, प अध्यक्ष डॉ, राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,परमेश्वर शेळके, किशोर हंबर्डे,डॉ, ढाकणे, संदिप सुम्बरे, ना तहसीलदार प्रदीप पांडुळे, डॉ, नितीन मोरे, डॉ, राहुल टेकाडे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉक्टर माले म्हणाले की मीच माझा डॉक्टर समजून तिसऱ्या कोरोना लाटेचा सामना करावा लागेल,  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे चांगले आहे. त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. फक्त रुग्ण मरत आहेत यावरच ट्रेस देऊन बघू नये. सुरुवातीलाच लक्ष दिल्यास हा आजार लवकर बरा होतो. प्रत्येकाने संकल्प करून स्वतःला covid-19 होऊ द्यायचा नाही असा निर्धार केला पाहिजे. गेल्या एक वर्षापासून सर्वसामान्य नागरिक हा कोरोनाच्या भीतीखाली जगत आहे. कोरोनाच्या  भीती मध्ये जगू नका.म्युकर मायक्रोसिस हा माणसाने निर्माण केलेला आजार आहे.

 भितीपोटी असे आजार उद्भवत असल्याने कोविड विषयाची भीती मनातून काढून टाका. कोरोना घरामध्ये येऊ न देण्याचा संकल्प सर्वांनी करावा, कोविड वर आपलेपणा हा सर्वात चांगला प्रथम उपचार आहे.तंबाखु,गुटखा, पान हे कोरोना वाढवण्याचे मुख्य करणे आहेत,  योगा, प्राणायाम केल्यास ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता पडत नाही, प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. जे रुग्ण कोविड मधुन मधून बरे होऊन आले आहेत त्यांनी इतरांची काळजी घ्यावी,सर्वात अगोदर सहा मिनिटे चालल्यावर आपल्या शरीरातला ऑक्सिजन तीन टक्‍क्‍याने कमी झाल्यास आपल्याला कोरोना झाल्याचे ओळखता येते. कोरोना काळात निगेटिव्ह गोष्टी लक्षात आणून नका,  निगेटिव्ह बातम्या सर्वात घातक आहेत. E संजीवनी ओपीडी च्या माध्यमातून घरी बसूनच उपचार घेऊन रुग्ण बरे होऊ शकतात. खाजगी डॉक्टरांचा ही संजीवनी ओपीडी मध्ये समावेश सुरू करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. 

आरोग्यसेवा सल्ला केंद्र निर्माण करून यामध्ये आपल्याला आजारानुसार तज्ञ डॉक्टर आपणास कोणते मेडिसिन ठेवायचे आणि ते सांगतात प्रत्येक तालुक्यामध्ये एक महात्मा फुले आरोग्य योजना हॉस्पिटल देणार आहोत. स्टेरॉईड, रेमडीशीवीर, अक्सिजन जास्त प्रमाणात वापरला गेल्यामुळे म्युकर मायकोशीस आजार  होतो.  या आजाराची तत्काळ नोंद करा म्हणजे तात्काळ औषधोपचार उपलब्ध होतील व इतर सुविधा मिळतील. माझं घर कोविड मुक्त माझं गाव कोविड मुक्त असा संकल्प सर्वांनी करावा , कोरोना ने आपलेपणाची व स्वच्छतेची शिकवण दिली. मनाने स्वस्थ रहा कोरोना विषयीची भीती मनातून काढून टाका कोरोना होणार नाही प्रत्येक गावात ऑक्सिजन गार्डन तयार करावेतअसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना आमदार  बाळासाहेब आजबे म्हणाले की, ग्रामीण भागात कोविड व इतर आजारांविषयी विशेष माहिती अद्याप पर्यंत झालेली नाही ती माहिती होणे गरजेचे आहे. 

आमचा आजपर्यंतचा कार्यकाळ कोविड चा सामना करण्यातच गेला आहे ,आरोग्य उपसंचालक डॉ, माले यांच्या मार्गदर्शनाने सर्वांना सकारात्मकतेचा उपदेश मिळाला आहे ,डॉक्टर पवार जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. प्रत्येक गावात महात्मा फुले आरोग्य अभियान मध्ये हॉस्पिटलची नावाची यादी व  आवश्यक कागदपत्राची यादी लावावी. प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. कोरोना बाबाचे मानसिकता बदला त्यामुळे कोणाचा त्रास होणार नाही सकारात्मक ऊर्जा ठेवा आजपर्यंत आपण 170 ऑक्शन बेड आष्टी मध्ये तयार करण्यात आली आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, डॉक्टर, अधिकारी यांनी काम केल्याने आपण कोरोनाचा सामना करत आहोत. तीन रुग्णवाहिकेची मागणीदेखील करण्यात आली आहे. त्याही लवकरच उपलब्ध होतील. लवकरच पाटोदा येथे मोठा ऑक्सीजन प्लांट होणार असून त्याचा फायदा जिल्ह्याला होईल आरोग्य मंत्री व पालकमंत्री धनंजय मुंढे यांचे या काळामध्ये खूप मोठे सहकार्य मिळाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मतदार संघात 350 रेमडीसीवर आपण एकही रुपया न घेता गरजवंतांना दिले, असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

यावेळी प्राचार्य सोपान निंभोरे, डॉक्टर ढाकणे डॉक्टर मधुकर हंबर्डे,डॉ, विलास सोनवणे डॉक्टर शरद मोहरकर एडवोकेट पारखे तात्या, जगन्‍नाथ ढोबळे ,यश आजबे ,कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप सुम्बरे, नाजिम शेख भाऊसाहेब घुले नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे सुपर व प्राचार्य बाबासाहेब मुटकुळे डॉक्टर मोरे, डॉक्टर राहुल टेकाळे, डॉक्टर गांधी, डॉक्टर प्रताप गायकवाड, डॉक्टर पटवा,  डॉक्टर मार्कंडे,सुधिर जगताप डॉक्टर जालिंदर वांढरे, सुभाष वाळके, डॉक्टर नदीम शेख डॉक्टर विशाल  वारंगुळे, प्राध्यापक ज्ञानेश्वर नवले, प्राध्यापक सातभाई, डॉक्टर प्रताप गायकवाड ,यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी मानले.


No comments