Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी परळी येथे भव्य रक्तदान शिबिर

छत्रपती संभाजी राजे जयंती व सौरभ दादा खेडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

परळी वैजनाथ : कोरोना महामारी च्या संकट प्रसंगी रक्त साठ्याचा तुटवडा पाहता इतर कार्यक्रम करण्याऐवजी सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांना रक्तपुरवठ्या ची खूप आवश्यकता आहे. याची जाणीव ठेवत संभाजी ब्रिगेड परळी शाखेच्यावतीने सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी, सकाळी १० वाजता सूज्वल मंगल कार्यालय, जलालपूर रोड, परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने परळी तालुक्यातील तरुण बांधवांना विनंती करण्यात येते की या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन आपण रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मदत करूया.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष ऍड.राहुल वायकर, अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्ह्या अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, प्रमुख उपस्थिती  संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष छत्रभुज देशमुख हे असणार आहेत.


या रक्तदान शिबिराचे आयोजक संभाजी ब्रिगेड परळी तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव,  विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवश्री नामदेव भालेराव, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष ईश्वर जीजा सोनवणे, शहराध्यक्ष शिवश्री संदीप काळे, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष दीपक शिंदे, मराठा उद्योजक कक्ष तालुकाध्यक्ष शिवश्री विठ्ठलराव साबळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हा उपाध्यक शिवश्री बाबा इंगळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष शिवश्री गणेश सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने,  सामाजिक कार्यकर्ते शिवश्री अरुण सपाटे, तालुका सचिव शिवश्री प्रभाकर सटाले, तालुका सहसचिव शिवश्री पुंडलिक लोणकर, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री प्रदुम्न सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री राम किर्दंत, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव शिवश्री विद्याधर शिरसाट, तालुका उपाध्यक्ष शिवश्री दशरथ इंगळे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री लक्ष्मण गव्हाणे, तालुका संघटक शिवश्री हनुमंत दिवटे, तालुका संघटक शिवश्री हनुमंत जाधव, तालुका संघटक शिवश्री विनोद सरोदे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री नंदू आबा शिंदे,तालुका कोषाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब सोनवणे तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, मराठा उद्योग कक्ष. यासह इतर सर्व कक्षा कडून जास्तीत जास्त रक्त दात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा अशी विनंती केली आहे. 


No comments