Breaking News

शिरूरमध्ये पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब कोविड केअर सेंटर सुरु खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरुर, का

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या पुढाकारातून मानवलोक संस्था अंबाजोगाई व सार्वजनिक आरोग्य विभाग बीडच्या मदतीने मॉडर्न इंग्लिश स्कुल संचालित ५० बेडचे 'पद्म विभूषण शरदचंद्रजी पवार साहेब कोविड केअर सेंटर' शिरूर कासार मध्ये सुरवात करण्यात आले असून कोविड केअर सेंटरचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा संसदरत्न खा.सुप्रियताई सुळे यांच्या हस्ते पार पडला.


यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे, आष्टी-पाटोदा-शिरूर चे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे काका, मानवलोक संस्थेचे अध्यक्ष अनिकेत लोहिया,जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हील सर्जन डॅा.सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.आर.बी. पवार,तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


No comments