Breaking News

साळेगावचे बस स्टँड अज्ञात व्यक्तीने पाडले : सरपंचाची विभागीय नियंत्रकाकडे तक्रार

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील साळेगाव येथील महामार्गाच्या हद्दीतील रस्त्यावरील बस स्टँड (प्रवाशी निवारा) रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडला असल्याची तक्रार सरपंचांनी विभागीय वाहतूक नियंत्रकाकडे केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथे महामार्गावरील मुख्य रस्ता हद्दीत प्रवाशांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बस स्टँड (प्रवाशी निवारा) बांधला होता. सदर बस स्टँड हे दि. २३ मे रविवार रोजी रात्री ९:३० ते १०:०० वा च्या दरम्यान अज्ञात इसमाने जेसीबी मशीनच्याया सहाय्याने पाडून नासधूस केली केली असल्याची तक्रार सरपंच कैलास जाधव यांनी पत्राद्वारे विभागीय नियंत्रक, बीड यांच्याकडे केली आहे. तसेच याच ठिकाणी नव्याने बस स्टँड उभारण्याची मागणी देखील केली आहे. याच्या प्रति परिवहन मंत्री ना. अनिल परब, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक केज आणि आगार प्रमुख धारूर आगार यांना दिल्या आहेत. दरम्यान या बस स्टँडचे किंवा त्याच्या बांधकामाचे कोणतेही माहिती उपलब्ध नसल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा फायदा घेऊन अज्ञाताने बस स्टँड पाडले असावे.


No comments