Breaking News

समाजाच्या भवितव्यासाठी आरक्षण मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे - आ विनायकराव मेटे

गौतम बचुटे । केज

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चात सर्व समाजघटकांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. विनायक मेटे यांनी केज येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केले.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे त्या संदर्भात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा हा बीड येथे निघणार आहे. त्या संदर्भात मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आ. मेटे हे केज मध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांच्या भवितव्यासाठी आरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी दि. ५ जून रोजी बीड येथे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सर्व समजघटकांनी सहभागी होऊन एकजुटीची ताकद दाखवून मराठा समाजाचे आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामहरी मेटे, लिंबराज वाघ, बाळासाहेब गलांडे, दादाराव वाघमारे, नामदेव गायकवाड, साक्षी हंगे, दत्ता चाळक, आंनद जाधव, दिपक कोल्हे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सामन्यातील असामान्य नेतृत्व म्हणजे आ. मेटे ! :- आरक्षण संदर्भात आ. मेटे हे तहान भूक विसरून पायाला भिंगरी बांधून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यांनी केज येथे तर जेवण करीत असताना म्हणजे एक घास तोंडात, एक घास हातात असताना पत्रकारांशी संवाद आरक्षणाची व मोर्चाची भूमिका विशद केली. 

No comments