Breaking News

पप्पू कागदे यांचा नेतृत्वाखाली होणाऱ्या एल्गारमध्ये हाजारो कामगार सहभागी होणार : भास्कर जावळे


बीड
: मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणाऱ्या राज्य सरकारचा पुरोगामीपणाचा बुरखा फाटला असून पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दि. १ जून ते दि. ७ जून दरम्यान एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती रिपाई कामगार संघटनेचे बीड तालुकाध्यक्ष अध्यक्ष भास्कर जावळे यांनी पत्रकाद्वारे दिलीय.

सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी येत्या ०१ जून ते ०७ जून पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकार हे स्वतःला कितीही पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्श्री महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकार हे मागासवर्गीय यांच्या विरोधी सरकार असल्याचे यावरून दिसत आहे.

मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा. या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यलयावर ०१ जून ते ०७ जून दरम्यान रिपाई तर्फे आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनात कोरोना प्रसाराचे सर्व नियम व अटी पाळून गर्दी न करता आंदोलन करण्यात येणार आहे. मागासवर्गीयांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या या कुचकामी आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी मा.ना. रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात राज्यभरातील लाखो कामगार सहभागी होणार असून आपल्या हक्कासाठी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भास्कर जावळे यांनी केले आहे.


No comments