Breaking News

बीड पालिका व जिल्हा रुग्णालयातील शव दाहक यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान

बीड : न्यू होप चॅरिटेबल ट्रस्ट बीड आयोजित तथा फादर संजय ल्युथर गायकवाड यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा रुग्णालय व येथील पालिकेच्या  शव दाहक यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान पत्र, सॅनिटाझर, मास्क व पुष्पगुच्छ देवुन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड,  शिरुर कासारचे तहसीलदार श्री. भदाणे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी फादर सोनवणे, मेट्रण श्रीमती दिंनकर, पोउपनि श्री. जमदाडे, न्यू होप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा फादर संजय ल्युथर गायकवाड, अल्फा ओमेगा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे, सुशांत सत्राळकर, प्रदिप हाजारे, अमोल जाधव, संकेत गायकवाड, गौरव गायकवाड, विश्वास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमस कैलास इंगोले, संतराम शिंदे, मनिष सोनटक्के, शंकर खंदारे, नतिन कळंमकर, दिपक शेनूरे, सुरेंन्द्र सौदा सर्व जिल्हा रुग्णालय शव दाहक कर्मचारी व आकाश गायकवाड, चंदु ईरेवाड न.प.बीड शव दाहक कर्मचारी उपस्थित होते.

No comments