Breaking News

मराठा समाजाच्या मोर्चास सहकार्य करावे ५ जूनला बीड येथे होणाऱ्या मोर्चा संदर्भात आ. मेटे यांची ग्रहमंत्र्याकडे मागणी

बीड :  मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि .५ जुने २०२१ रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे . सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत , कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल . तरी आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या शांततेत निघण्याचा इतिहास लक्षात घेऊन हा नियोजित मोर्चा शांततेत काढण्यासाठी पोलीस प्रशासन व आपण सहकार्य करावे असे निवेदन शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी राज्याचे ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

          मराठा समजाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला न्याय कसा देणार आरक्षण कसे मिळणार , आमचे मुल - मुली शिक्षणात आणि नौकरी मध्ये काय करणार , त्यांच्या शिष्यवृती , फीसची प्रतिपूर्ती यासारखे प्रश्नावर शासन कोणतीही भूमिका घेत नाही. या कारणाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून , सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल. तसेच  या मोर्चाची घोषणा झाल्यापासून मराठा समाजातील तरुणांना , समाजात सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून त्रास देत असल्याचे आढळून आले आहे . तरी या मोर्चास पोलीस प्रशासन आणि आपण सहकार्य करावे असे निवेदनात आ. विनायक मेटे यांनी म्हंटले आहे.

No comments