Breaking News

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस रक्तदान व कोविड सेंटरमधील रुग्णांना फळवाटप करून केला साजरा

गौतम बचुटे । केज  

वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस 10 मे स्वाभिमानी दिन स्वाभिमानी सप्ताह म्हणून वंचित बहुजन युवक आघाडी बीड तालुका केज च्या वतीने रक्तदान शिबिर तसेच कोविड सेंटर शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी रुग्नाना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.

सविस्तर बातमी पत्र असे की वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा आज वाढदिवस हा वाढदिवस वंचित बहुजन युवक आघाडी बीड तालुका केज युवा नेते निलेश भैया साखरे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसेच कोविड सेंटर तसेच शासकीय रुग्णालय याठिकाणी रुग्णांना फळवाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

रक्तदान शिबिरास वीस जणांनी रक्तदान केले या कार्यक्रमास सुरेश बचुटे अजय भांगे उत्तम आप्पा वाघमारे पत्रकार अशोक सोनवणे पत्रकार गौतम बचुटे पत्रकार महादेव गायकवाड पत्रकार रंजीत घाडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर  सदरील कार्यक्रमास आरोग्य कर्मचारी म्हणून डॉक्टर भाग्यश्री मुंडे मॅडम श्री जगदीश रामदासी शशिकांत पारखे के बी कांबळे अंकुश खरटमोल हे उपस्थित होते प्रथमता सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले व प्रत्यक्ष रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी गणेश लांडगे शंकर कसबे सुलेमान काजी विजय अंडील लखन मस्के समाधान हजारे महेश जाधव गणेश लांडगे गणेश चांदणे शशिकांत गायसमुद्रे लखन भालेराव सावता मनोज शिंदे रासवे विशाल कुचेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय भांगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते निलेश साखरे यांनी केले. 

No comments