Breaking News

पाडळीगावचे उपसरपंच गहिनीनाथ पाखरे यांनी कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी दिला किराणा माल आणि भाजीपाला

शिरुर, का : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले पाडळी गावचे उपसरपंच गहिनीनाथ जिजा पाखरे यांनी शिरुर कासार येथील लोकनेते गोपीनाथ प्रतिष्ठान, आनंदवन व शांतीवन संचलित कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी शनिवारी (दि.२९) किराणा माल आणि भाजीपाला दिला. 

यावेळी शांतीवनचे अध्यक्ष दिपक नागरगोजे, पाडळी गावचे सरपंच रामदास हांगे, आनंदगावचे सरपंच प्रल्हाद विघ्ने, दिपक पाखरे, विवेक पाखरे, महेश उगलमुगले, प्रा गोरख सानप, भागवत भारगजे, कालिदास आघाव, संदीप पाखरे, कल्याण कराड आदींची  उपस्थिती होती.


No comments