Breaking News

शेतीशी निगडित कृषी दुकानांना लॉकडाऊन मधून सूट द्यावी - पशुपतीनाथ दांगट

केज  : सध्या शेतीची खरीप हंगामात पेरणी पूर्व कामे सुरू असून पेरणीपूर्व मशागतीची कामे करण्यास लॉकडाऊनमुळे अडथळा येत आहे. शासनाने १५ मे ते ३१ या काळात कृषी दुकाने व शेतीशी निगडित दुकानांना लॉकडाऊनमधून सूट देण्याची मागणी केज तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

 

पंधरा दिवसांवर खरीप हंगाम येऊन ठेपला असून शेतीच्या पूर्व मशागतीची कामे लॉकडाऊन मुळे रखडलेली आहेत. त्यामुळे १५ मे नंतर कृषी दुकाने व शेतीशी निगडित दुकाने सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी. जेणे करून शेतकरी आपली खरीप हंगामातील पेरणी पूर्व कामे उरकून शकतील. तसेच १ जून नंतरच जर कृषी दुकाने उघडली तर एकदम मोठी गर्दी निर्माण होईल.

 सोशल डिस्टन्स देखील पाळलाव जाणार नाही. परिणामी पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील. त्या मुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून या दुकानांना उघडण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी केज तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार डी. सी. मेंडके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी काँग्रेसचे युवा नेते पशुपतीनाथ दांगट, तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे व समीर देशपांडे यांनी हे निवेदन तहसीलदार यांना दिले.No comments