Breaking News

आ. संजय भाऊ दौड याच्या हस्ते बर्दापुर येथे सुसज्ज कोविड सेंटरचे उदघाटन

शिवाजी भोसले । अबाजोगाई 

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथे जिल्हा परिषद बिड व ग्रामपंचायत बर्दापुर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई यांच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत व बर्दापुर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत बर्दापुर येथील पद्दामवती मंगल कार्यालयात  येथे स्व महादेवआप्पा  रामलिंगआप्पा दामा कोविड सेंटर अतिशय सुसज्ज ५० खाटाचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.या मुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना चांगलाच फायदा होणार आहे.

 या कोविड सेंटर साठी मा ना धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री बीड जिल्हा यांच्या कडे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य विलास (बापू) मोरे यांनी पाठपुरावा करून हे कोविड सेंटर बर्दापुर येथे आनले आसुन याचा फायदा ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला होणार आहे या वेळी आ संजय दौंड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या वेळी डॉ माले सर आरोग्य उपसंचालक लातूर,राजेसाहेब देशमुख माजी आरोग्य व शिक्षण सभापती बीड,गोविंदराव देशमुख सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई राजेश्वर देशमुख तालुका समन्वय व पुनर्विलोकल समिती अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य पटेल पोलीस निरीक्षक शिंदे ,पोलीस उप निरीक्षक जमादार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब लोमटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ राहुल हाडबे , मुक्तार देशमुख, सरपंच सुधाकर शिनगारे, ग्रामविकास अधिकारी नखाते, तलाठी गायकवाड , यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य ,पत्रकार आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. No comments