Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आ.धसांचे पत्र..! कोविड विषाणू प्रादुर्भाव संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपाय योजना कराव्यात : आ.सुरेश धस

आष्टी :  आगामी काळात राज्यात रेमडेसीवीर आणि म्युकरमायकोसेस वरील औषधे यांचा काळाबाजार होऊ नये,यासाठी भविष्यातील लहान मुलावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा राज्यात उपलब्ध करण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घ्यावा व मागील दोन वर्षापासून कोवीड विषाणु प्रादुर्भाव संसर्गामुळे कराव्या लागणाऱ्या उपायोजना मध्ये टाळेबंदी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर छोटे व्यवसायिक व हातावर पोट असणारे लोक यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे या कुटुंबातील लहान मुलावर राज्यातील शासकीय दवाखान्यात प्रमाणेच सर्व खाजगी दवाखान्यात मोफत उपचार  व्हावेत व त्यांचा खर्च राज्य शासनाने भरावा असे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे याना दिलेल्या पञात  आ.सुरेश धस यानी म्हटले आहे.

          याबाबत कि. राज्यात सध्या कोविड विषाणू प्रादुर्भाव संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने भयानक रूप धारण केले असून.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.अशा वेळी वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. यातील बहुतांश लोक हे ग्रामीण भागातील तरुण शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. असे दिसून येत आहे.

दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच राज्यात कोविड विषाणू प्रादुर्भाव संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या मध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका आहे. याबाबत तज्ञांनी इशारा दिलेला आहे.दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची पुरेशी तयारी नसल्यामुळे झालेली वाताहत भयावह आहे. या अनुषंगाने तिसऱ्या लाटेत आणखी जीवितहानी होऊ नये म्हणून या विषाणूच्या प्रदुर्भाव निर्मुलनासाठी उपाययोजना कराव्यात यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना लहान मुलांवर योग्य उपचार व्हावेत. यासाठी लगेचच राज्यातील प्रत्येक जिल्हयात बालरोगतज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी व राज्यस्तरावर उत्कृष्ट बालरोगतज्ञांची शिखर समिती स्थापन करण्यात यावी.

तसेच तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना केवळ लहान मुलांची कोरोना चाचणी व त्यावरील उपचार करून भागणार नाही. तर लहान मुलांच्या सर्वंकष चाचण्या करून त्यांच्या शरीरात ज्या घटकांची कमतरता आहे. ते घटक त्यांना मिळावेत यासाठी डायट प्लॅन करून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवावी. मुलांना योग्य आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहार योजना अंगणवाडी साठी असणारी पोषक आहार योजना या योजनांमधून प्रोटीनयुक्त तसेच इतर आवश्यक अन्नघटक असणारा आहार मुलांना घरपोच देण्यात यावा.

 आगामी काळात राज्यात रेमडेसीवीर आणि म्युकरमायकोसीस वरील औषधे यांचा काळाबाजार होऊ नये यासाठी भविष्यातील लहान मुलावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा राज्यात उपलब्ध करण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घ्यावा पाच मागील दोन वर्षापासून कोवीड विषाणु  प्रादुर्भाव संसर्गामुळे कराव्या लागणाऱ्या उपायोजना मध्ये टाळेबंदी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर छोटे व्यवसायिक व हातावर पोट असणारे लोक यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे या कुटुंबातील लहान मुलावर राज्यातील शासकीय दवाखान्यात प्रमाणेच सर्व खाजगी दवाखान्यात मोफत उपचार  व्हावेत व त्यांचा खर्च राज्य शासनाने  भरावा असे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे याना दिलेल्या पञात आ.सुरेश धस यानी म्हटले आहे.                                   

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे अगोदर शासनाने कृती कार्यक्रम हाती घ्यावा..!

भविष्यातील लहान मुलावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा राज्यात उपलब्ध करण्यासाठी कृती कार्यक्रम हाती घ्यावा व मागील दोन वर्षापासून कोवीड विषाणु  प्रादुर्भाव संसर्गामुळे कराव्या लागणाऱ्या उपायोजना मध्ये टाळेबंदी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर छोटे व्यवसायिक व हातावर पोट असणारे लोक यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे या कुटुंबातील लहान मुलावर राज्यातील शासकीय दवाखान्यात प्रमाणेच सर्व खाजगी दवाखान्यात मोफत उपचार व्हावेत व त्यांचा खर्च राज्य शासनाने भरावा.  

               आ.सुरेश धस


No comments