Breaking News

गोंडस बातम्या देण्यापेक्षा प्रशासनाने कृतीवर भर देणे गरजेचे - आ.सुरेश धस


के. के. निकाळजे । आष्टी

बीड जिल्ह्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बीड जिल्ह्यात मृृृृृृत्यूचे तांडव होण्यास सुरूवात झाली असून,जिल्हा प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे जिल्ह्यावर अशी वेळ आली आहे.गोंडस बातम्या देण्यापेक्षा कृतीवर द्या म्हणत सद्यस्थितीतील प्रशासनाच्या सुस्त कारभारावर आ.सुरेश धस यांनी चौफेर टिका केली.जिह्यात सध्या कोरोना टेस्टचे किट उपलब्ध नाहीत. लसीकरणाचे नियोजन नाही,बेड उपलब्धता, रेमडीसेवीहरचा काळाबाजार यावर प्रशासनाची कसलीच पकड नसल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यावर वाईट वेळ आली असल्याचे आ.सुरेश धस म्हणाले.

             आष्टी निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत ते बोलत होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,बीड जिल्ह्यात रूग्णांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. तपासणी साठी लागणारे अॕटीजन व आरटीपीसीचे किट उपलब्ध नाही.याचे सर्व अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत.परंतु अशावेळी तपासणी किट कधी सपंणार ह्याची माहिती मुख्याधिकारी यांना होत नाही का?असा सवाल उपस्थीत करत कोरोनाच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाचा बट्याबोळ झालेला दिसत असून, लसीकरणातही ताळमेळ नाही,जे कोवीड हाॅस्पीटल आहेत.त्यांची माहिती वेळेवर प्रशासन यंञना घेत नसल्याने कोणत्या रूग्णालयात किती रूग्ण गंभीर आहेत याचा मेळ लागत नाही.

सध्या देशामध्ये सर्वाधिक कोरोना बाधीतांमध्ये आठ जिल्हे आहेत त्यामध्ये आपल्या शेजारचा अहमदनगर जिल्हा असल्यामुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांची आवक जावक नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा परिस्थीतीत बीड जिल्हा प्रशासनाने आष्टी,पाटोदा व शिरूर भागाला मोठ्या प्रमाणावला लागणारे आरोग्य साहित्य पुरविण्याची गरज आहे.माञ हे होत नसल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे.तसेच  कोरोनाग्रस्त रुग्ण होम आयसोलेट केल्यानंतर त्या रुग्णांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असतांना हे रुग्ण बिनधास्त समाजात फिरताना दिसतात. शासनाने आरोग्य कर्मचा-यांचीही भरती लवकरात लवकर करणे गरजेचे आहे.जीएनएम विद्यार्थ्यांचे तीन वर्षाचा कोर्स असून लाॅकडाऊनमुळे एक वर्ष वाया गेले त्यांची देखील नियुक्ती करणेही गरजेचे असल्याचेही आ.धस म्हणाले.

पैसे कमविण्याचा गोरख धंदा

सध्या काही विभाग खो-याने पैसा ओढत आहे.शिवाय आठच तास काम करणार असल्याचे सांगतात पण त्यांनी बारा तास काम करणे गरजेचे आहे.तसेच काही खासगी डाॅक्टर व इतर काही विभाग हे अशा काळात निव्वळ पैसा कमावण्याच्या मागे असल्याचा आरोपही आ.धसांनी केला.

जिल्ह्यात मृृृृत्यूचे तांडव होण्यास सुरूवात

जिल्ह्यात कोरोना रूग्णांना आॕक्सीजन बेड मिळेना तसेच रूग्ण रस्त्यांवरच चालता चालता च किड्या मुंग्यासारखे मृृृृत्यूमुखी होत असल्याचे चिञ आहे.घाबरलेले लोक लसणीकरणाला जरी गेले तरी तिथेही लसीकरण वेळेवर होत नाही.याचे नियोजनही या प्रशासनाला करता येत नाही त्यामुळे जिल्ह्यात मृृृृृृत्यूचे तांडव होण्यास सुरूवात झाल्याची परिस्थिती असून प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना राबवाव्यात असेही आ.धस म्हणाले.


No comments