Breaking News

रस्त्याच्या कडेला उभी केलेली मोटार सायकल गेली चोरीला

गौतम बचुटे । केज  

पाऊस पडत असल्याने रस्त्याच्या कडेला मोटार सायकल उभी करून शेजारी निवाऱ्यासठी थांबलेल्या एकाची मोटार सायकल चोरीला गेली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ मे रोजी दुपारी येवता येथील अशोक शांतीनाथ भांगे व त्याचे मित्र हे होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल क्र (एमएच १३ /सीएम २२८७) वरून येवता मार्गे जिवाचीवाडी येथे पाहुण्यांकडे जात असताना वाटेत पाऊस सूरु झाला; म्हणून ते मोटार सायकल रस्त्याच्या कडेला उभी करून शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या कोठ्यात निवाऱ्यासाठी थांबले होते. पाऊस उघडल्यावर त्यांनी रस्त्यावर येऊन पाहिले असता त्यांची मोटार सायकल उभी केलेल्या जाग्यावर नव्हती. तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. म्हणून दि. २४ मे रोजी अशोक शांतीनाथ भांगे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


No comments