Breaking News

चालत्या टेम्पोतील ३३ हजार रुपायांच्या किराणा मालाची चोरी


गौतम बचुटे । केज 

नेकनूर ते केज दरम्यान चालत्या टेम्पोतील ३३ हजार रु च्या किराणा सामानाची अज्ञात चोरट्यानी चोरी केले आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि ९ मे  रात्री ९:०० ते १०:०० वा. च्या दरम्यान केजच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोतील ९ गोडे तेलाचे डब्बे व ४ चना बेसनचे कट्टे असे एकूण ३३ हजार २९४ रु चे सामान अज्ञात चोरट्यानी नेकनूर ते केज दरम्यान चोरून नेले आहे. या प्रकरणी टेम्पोचा चालक जनार्धन उत्तम उघडे याच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध भा दं वि २३२/२०२१ गु र नं ३७९ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत. 


No comments