Breaking News

केज तालुक्यात गॅस गळती होऊन घराला आग : सासू व सुनासह सहा वर्षाची मुलगी जखमी

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे एका घरातील गॅस गळती झाल्याने घराला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून सासू सुनासह एक लहान मुलगी जखमी झाली आहे.

         

सोने सांगवी येथे दि.२९ मे शनिवार रोजी सकाळी अंदाजे ९:३० ते १०:३० वा. च्या दरम्यान विष्णू बाजीराव कणसे यांच्या घरातील गॅस सिलेंडर मधून गॅस गळती होऊन पेट घेतला. सदरील प्रकार घडल्याने घरातील विष्णू कणसे यांच्या पत्नीने व सूनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. यामध्ये सुक्षाला विष्णू कणसे (वय ५० वर्ष), जयश्री अशोक कणसे (वय३५ वर्ष) आणि श्रध्दा अशोक कणसे (वय ७ वर्ष) या तिघी जखमी झाल्या आहेत.त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत घरातील नगदी रकमेसह सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असून संबंधित तलाठी व मंडलाधिकारी हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर युसूफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे याना माहिती  मिळताच ते अधिक तपास करीत आहेत.



No comments