Breaking News

बीड शहरात संभाजी महाराज जयंती अनोख्या पद्धतीने साजरी ; अनावश्यक खर्च टाळून मास्कचे केले वाटप -आकाश जाधव

बीड :  शहरातील आज संभाजीनगर भागामध्ये महापराक्रमी धर्मवीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कोरोनाचे सर्व नियम पाळून जयंती साजरी करण्यात आली या निमित्त छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन करण्यात आले शिवछत्रपती पुत्र संभाजी महाराज जयंती निमित्त,आकाश जाधव यांनी 2000 मास्क शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी गोरगरीब जनतेला. कोरोना ची भीती न बाळगता आकाश जाधव यांनी स्वहस्ते गोरगरिबांच्या चेहऱ्याला लावून तरुणाईमध्ये नवीन उपक्रम राबवून एकजनहिताचा संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचं काम या तरुणाईने केले आहे. गोरगरीब जनतेन या उपक्रमाला प्रोत्साहन दिले व कौतुक केले.असे उपक्रम इतर मुलांनी ही राबवले तर समाजाचे ऋण म्हणून ऐक खारुताईचा वाटा या मुलांनी उचलला आहे. 

 समाजाच्या ऋणातून थोडं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ,मास्क वाटून प्रयत्न केला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड शहरातील विविध भागामध्ये महापराक्रमी धर्मवीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती  मास्क वाटप करून साजरी करण्यात आली  यावेळी सर्व युवकांनी मास्क विविध ठिकानी गरजू व्यक्तींना मास्क वाटप केले . जयंती खर्च टाळून सर्व तरुणांनी बीड च्या  भागांमध्ये कोरोना जनजागृती करून गरजूंना मदत करण्याचे ठरवले आहे यासारखे कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे उपक्रम राबवून समाजाला एक नवीन दिशा ही मिळेल व कोरोनासारख्या महामारीमध्ये सामाजिक बांधिलकी जपवण्याकरता माझ्यासारखे तरुणाने पुढे येणे गरजेचे आहे असे आकाश जाधव यांनी म्हटले आहे. यावेळी शैलेश गिरी, यौगेश मनेरी, विष्णू गिरी यांनी ही मास्क वाटप केले. 


No comments