Breaking News

केज (पिसेगाव) येथील कोरोना केंद्रात डॉ. चौरे यांच्या मेहनतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

गौतम बचुुुटे । केेेज

येथील पिसेगाव येथील कोरोना सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. चौरे आणि त्यांचे सहकारी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

केज येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह केज येथे कोरोना देखभाल केंद्र सुरू आहे. तहसिलदार डी.सी. मेंडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. आसाराम चौरे यांच्याकडे पदभार आहे. 

या केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांच्या सोबत डॉ. विवेक बचुटे, डॉ. तारळकर, डॉ. सोनवणे मॅडम या अहोरात्र रुग्णांची काळजी व उपचार देत आहेत. त्यांना मदत करणारे परिचारिका आणि ब्रदर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर्स, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक यात रणजित सोनवणे, ऋषिकेश मुंडे, स्वाती ठोंबरे, दिपाली नागरगोजे, वंदना भोसले, शितल कोठुळे, रोहित धपाटे, उषा गोपाळघरे, हजारे, जिजाबाई ढाळे, सुलभा हजारे, राजाभाऊ भोसले, शिंदे, काळे, स्नेहल हजारे, जय जोगदंड, विक्की हजारे, अशोक गाडे,यासिन शेख, अतुल थोरात, उमाकांत राऊत रुग्णवाहीका चालक मकरंद घुले, गणेश सूर्यवंशी, अण्णा इंगळे, वैभव काळे या सर्वांचे अत्यंत चांगले काम असून त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे रुग्णाची प्रकृती लवकर बरी होत आहे. रुग्णांना ठरवून दिलेल्या मेनू प्रमाणे दररोज वेगवेगळ्या प्रकारचा आहार व प्रतिकार शक्ती वाढविणारा पूरक आहार देखील दिला जात आहे. या मुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.

" कोरोनाची लक्षणे जाणवताच तात्काळ अँटिजेन आणि आरटी-पीसीआर तपासणी करून घ्यावी आणि जवळच्या केंद्रात भरती होऊन उपचार घ्यावे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी तपासणी व उपचार घ्यायला हवेत."

              ---डॉ आसाराम चौरेNo comments