Breaking News

मराठवाडयात निवडणूक बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारा-आपचे संघटक सुग्रीव मुंडे


विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे मागणी

औरंगाबाद : मराठवाडयामध्ये सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोवीड प्रतिबंधीत लस देणे चालू आहे. परंतु या लस देण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रचंड गोंधळ आहे.प्रशासकीय पातळीवर समन्वय नाही.नागरीकांना लस घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्याच बरोबर ग्रामीण भागामध्ये तर लस देण्या संदर्भात प्रशासनाने कुठलेही नियोजन केलेले दिसत नाही, त्यामुळे लस घेणाNया नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन आपल्याला लस मिळते की नाही ही भिती निर्माण झाली आहे.

वय वर्ष ४५ च्या वरील नागरीकांना लस देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धादंल उडत आहे.केंद्राने १८ वर्षावरील नागरीकांना १ मे २०२१ पासुन लस देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. राज्यशासनाने जरी १ मे २०२१ ही तारीख पुढे ढकलली असली तरी या संपूर्ण लसीकरण मोहिमेचा आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडणार आहे व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत असल्याचे दिसुन येत आहेत.या करिता यावर नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.असे मत आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यानी व्यक्त केले आहे.

जिल्हयामध्ये १८ वर्षावरील नागरीकांना तसेच सध्या देण्यात येणाNया ४५ वर्षावरील नागरीकांसाठीच्या लसीकरणा बाबत मराठवाडयातील सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृती आराखडा तयार करुन प्रत्येक जिल्हयातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये सुनियोजीत पध्दतीने लसीकरण करावे जेणे करुन लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व सर्वाना लस उपलब्ध होईल असे पत्रात नमूद केले.आम आदमी पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांनी मराठवाडयाचे विभगीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेकर याना काही विनंतीवजा ईमेलव्दारे निवेदन पाठवलेले केले.

निवेदनात मराठवाडयातील प्रत्येक जिल्हातील प्रशासनास लसीकरण मोहिम राबविण्या बाबत काही  मागण्या अशा की, जिल्हयामध्ये १८ वर्षावरील नागरीकांचा आकडा विचारात घेता लसीची योग्य ती मागणी व साठा उपलब्ध करून ठेवावा. विधानसभा निवडणूकीसाठी ज्या मतदान केंद्रांचा वापर केला जातो त्याच मतदान केंद्रांवर एक हजार ते एक हजार दोनशे नागरीकांना लसीकरण करण्यात यावे. लसीकरण करीत असतांना सर्वांनांच ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही त्यामुळे लसीकरण केंद्रावरच वेगळी अशी नोंदणी व्यवस्था करण्यात यावी. ज्या नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशा नागरीकांना दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी.

 ही लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई व आशा वर्कर आणि शहरी भागातील लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठा महापौर,नगरअध्यक्ष,मुख्यअधिकारी आणि नगरसेवक  यांची मदत घेण्यात यावी. चार दिवसात सर्व मागण्यावर विचार करुन तात्काळ कारवाई करावी अन्यथा मराठवाडयात आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल असे मराठवाडा संघटन मंत्री सुग्रीव मुंडे म्हणाले.


No comments