Breaking News

आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नातून मोमीनपुरा भागात उभारला जाणार शादीखाना


25 लक्ष रूपयाचा निधी मंजुर; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी दिली मंजुरी 

बीड : निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दाची पुर्तता आ.संदिप भैय्या क्षीरसागर करत असून त्यांच्या प्रयत्नातून मोमीनपुरा भागात भव्य दिव्य असा शादीखाना उभारला जाणार असून यासाठी 25 लक्ष रूपयाचा निधी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी मंजुर केला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरात आणि ग्रामीण भागात विविध विकास प्रश्न मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 
बीड शहरातील मोमीनपुरा भागात शादीखाना उभारण्यात यावा अशी मागणी या भागातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्याकडे शिष्टमंडळाने केली होती. 
निवडणूकीतही मोमीनपुर्‍याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली होती. शादीखान्याबरोबर इतर विकास कामेही मार्गी लावण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्रयत्नशिल असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. मोमीनपुरा भागात शादीखाना बांधकामासाठी 25 लक्ष रूपयाचा निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी मोमीनपुरा भागातील शादीखाना बांधकामासाठी 25 लक्ष रूपयाचा निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.24 मे रोजी अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव दी.मा.सोनवणे यांनी निर्गमीत केला आहे. आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला हे यश असून मोमीनपुरा भागातील नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीकांचे मानले आभार
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी मोमीनपुरा भागात शादीखान्यासाठक्ष 25 लक्ष रूपये मंजुर केल्याबद्दल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मोमीनपुरा भागात शादीखाना उभारण्यात यावा यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशिल होते. 

No comments