Breaking News

जिओ जिंदगीच्या पाठीशी ना. धनंजय मुंडे यांचा सेवाधर्म

भाकरीच्या दवाखान्यात डी एम यांचे ऑक्सिमीटर 

बीड : कोरोनाचे संकट समोर असताना जिल्ह्यातील सेवाभाव सोबत घेऊन लोकजीवन वाचवण्यासाठी  विविध संस्था काम करत आहेत . कोरोनाच्या दोन्ही लाटेत जिओ जिंदगी मोहिमेत परिणामकारक मदत झालेली आहे या मोहिमेतील वाहकांना आवश्यक साधने देऊन पालकमंत्री ना.  धनंजय मुंडे यांच्याकडून प्रोत्साहन देण्यात आले. 

जिल्हाभरात शासन प्रशासन यांच्या सोबत सेवाभाव जागृत करण्याचे काम होत आहे याचं भूमिकेतून जिओ जिंदगी मोहिमेतील वाहकांना किट देण्यात आली . यावेळी प्रशांत जोशी यांनी सुरक्षा किट जिओ चे वाहक लोकपत्रकार भागवत तावरे धनंजय गुंदेकर  पत्रकार नितीन चव्हाण रोहित लंबे  सुभाष कबाडे प्रफुल्ल हाटवटे यांच्याकडे दिल्या . सदरील किट ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या जिओ वाहकास दिल्या जातील असे जिओ कडून कळवले आहे. 

जिओ चे वाहक कोरोना काळात दवाखाने व दवाखान्या बाहेर देखील आपला जीव धोक्यात घालून मदतकार्य करत आहेत. त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी सेवाधर्म अंतर्गत कोरोना सुरक्षा किट जिओ जिंदगी टीम ला पाठवल्या आहेत,असे धनंजय मुंडे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. या किट मध्ये ऑक्सीमिटर , वाफ घेण्याचे साधन , डेटॉल , मास्क , जलनीती  उपकरण सैनीटायजर अश्या आवश्यक वस्तू देण्यात आल्या. 


No comments