Breaking News

आप पार्टी व जिओ जिंदगीच्या यज्ञात डॉ.जितीन वंजारे यांची अनमोल सेवा ; खांबालिंबा येथील 'वैद्यकीय सप्ताह' चा समारोप


बीड
:  जिओ जिंदगी  आणी आम आदमी पार्टी व संजीवनी सेवाभावी संस्था संचलित संजीवनी हॉस्पिटल खालापूरी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात दिवसापासून चालू असणाऱ्या मोफत निशुल्क औषधी उपचार शिबीर म्हणजे वैद्यकीय सप्ताह ठेवण्यात आला होता.यात गेली सात दिवसापासून  खांबा लिंबा गावात मोफत वैद्यकीय सेवा चालू होती हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे,जिल्हासचिव रामधन जमाले,जिओ जिंदगी चे धनंजय गुंदेकर,लोक पत्रकार भागवत तावरे ,मुक्त पत्रकार ढाकणे,संजीवनी सेवाभावी संस्था संचालित संजीवनी हॉस्पिटल चे संचालक मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे.आखिल शेख, तालुका अध्यक्ष आप शिरुर  खालापूरीकर ,गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक धांडे आणी ऋषिकेश धांडे इत्यादीनी विशेष प्रयत्न केले.

         या शिबीरासाठी गावातील सरपंच परमेश्वर बडे ,अंगणवाडी सेविका मीनाताई,तसेच गावातील   इतर लोकांनी पण सहकार्य केले .यामध्ये अशोक येडे यांनी स्वतःची पेन्शन खर्च करून मेडिसिन चा खर्च केला आणी शिबीर यशस्वी केले .यात मोलाची साथ लाभली ती खालापूरी येथील सामाजिक कार्यकर्ते व संजीवनी सेवाभावी संस्था संचलित संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी गेली सात दिवस मोफत सेवा दिली .

              जिओ जिंदगी या संस्थेने लॉकडाउन मध्ये गोरगरीब लोकांना भाजी भाकरी ची सोय केली आणी ज्या गावांनी भाकरी दिल्या त्याच गावात परत मोफत वैद्यकीय सेवा पुरवली यात आम आदमी पार्टी चे सर्व कार्यकर्ते हिरीरीने सहभागी झाले आणी शिबीर यशस्वी केले .

             या वैद्यकीय सप्ताह च्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप चे जिल्हाध्यक्ष अशोक येडे हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर संघटनेचे  डॉक्टर बडजाते हे होते.तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक हिमा डॉक्टर संघटनेचे जिल्हा महासचिव डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर हे होते .यावेळी प्रास्ताविक आप चे सचिव जमाले सरांनी केले ,सूत्रसंचालन कल्याण मिसाळ यांनी केले तर प्रमुख वक्ते डॉक्टर जितीन वंजारे म्हणाले की समाजाप्रती आपण देणे लागतो सर्वांनी सेवा भाव जपला पाहिजे. 

आपले आरोग्य आपली जबाबदारी या युक्ती प्रमाणे काळजी घेतली पाहिजे आणी सर्वांनी मदतीची भावना ठेवली पाहिजे अशी भावना व्यक्त  केली.यावेळी त्यांनी कोरोना महामारीत योग्य खबरदारी व काळजी घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले .यावेळी अध्यक्ष येडे अशोक यांनी दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आदर्श मनामध्ये ठेवून सामाजिक कार्य यापुढे ही करत राहणार असे सांगितले.

तसेच प्रमुखपाहुणे  डॉक्टर बडजाते यांनी आपले कोविड् काळात ले अनुभव शेअर केले. या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल गावाचे सरपंच पती परमेश्वर बडे यांनी  गावकऱ्या च्या वतीने आलेल्या सर्व मान्यवराचे आभार मानले.आणी गावकर्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.  

No comments