Breaking News

सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला


शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली;खून,चोऱ्या,

मारामारीच्या घटनांनी वातावरण निघाले ढवळून!

शिरूर कासार : शिरूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून खून,मारामाऱ्या आणि चोरीच्या घटनांमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.विशाल कुलथे खून प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सकाळी गोमळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.आमच्या प्रतिस्पर्ध्याला मदत करत असल्याचा संशय व राग मनात धरून गावातील कातखडे कुटुंबातील लोकांनी गवळी कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सकाळी घडली आहे.

गत सात ते आठ महिन्यांपासून कातखडे कुटुंबीय अजिनाथ गवळी यांना शिवीगाळ करत असून शुक्रवारी सकाळी गोमळवाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला बीडला घेऊन जाण्यासाठी ते आणि त्यांचे वडील जात असताना असाच शिवीगाळ करण्याचा प्रकार घडल्यामुळे अजिनाथ गवळी हे जाब विचारण्यासाठी गेले.या वेळी सचिन कातखडे व इतरांनी कुऱ्हाड,लोखंडी टांभी व दगडांनी हल्ला करून त्यांना गंभीर जख्मी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.जख्मी अजिनाथ गवळी व त्यांचे वडील या मध्ये गंभीर जख्मी झाले आहेत.त्यांना शिरूर येथील ज्ञानसुधा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करून प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


No comments