Breaking News

मराठवाड्यात आष्टी तालुक्याचे नाव लौकिक करणारे व्यक्तीमत्व डॉ नितीन मोरे


आष्टी : बीड जिल्हा म्हटलं तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका म्हटलं तर अनेक अधिकारी व कर्मचारी नौकरी करण्यास नकार देतात. परंतु कायद्याच्या चौकटीत राहून काम केल्यास कोणालाही अडचणी येत नाहीत. येथे दोन आमदार तसेच दोन पावरफुल माजी आमदार असून विविध पक्षाचे अनेक छोटे मोठे पुढारी तसेच समाजसेवक आहेत. आष्टी तालुका म्हटलं तर येथील पाणी प्रश्न, बेरोजगारी, उद्योगधंदे, नागरिकांचे मूलभूत प्रश्न, आरोग्य सेवा असे अनेक प्रश्न आहेत. दोन वर्षांपासून आरोग्य विभाग हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.

 आष्टी तालुक्यातील आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच कडा धामणगाव सुलेमान देवळा खुंटेफळ व टाकळसिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांअभावी ओस पडली होती. त्याचे कारण म्हणजे येथे कार्यरत असलेले काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच भौतिक सुविधांचा अभाव. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अगदी नगण्य होते. परंतु दोन वर्षांपूर्वी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ नितीन मोरे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत या केंद्राचा कायापालट केला. येथे उपचारासाठी दररोज दहा रुग्ण ही येत नव्हते तर आता अडीचशेच्या दरम्यान ओपीडी चालत आहे. येथे येणाऱ्या रुग्णासाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आष्टी तालुक्याचे नाव मराठवाड्यात नावलौकिक झाले. डॉ नितीन मोरे यांच्या कार्याची दखल वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्यावर २ नोव्हेंबर २०२० रोजी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी पदाची महत्त्वाची व संपूर्ण तालुक्याची जबाबदारी दिली व ते आजही उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडत आहेत. 

डॉ नितीन मोरे यांनी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही उपचारासाठी खासगी रुग्णालयात न जाता आपल्याकडे कसे येतील या बाबत बैठक घेऊन अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत असताना त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा दिली. प्रत्येक गाव वाड्या वस्ती येथे जाऊन जनजागृती केली. तसेच पाच मोबाईल टेस्टिंग टीम कार्यरत केल्या. 

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात (आरसीएच) आष्टी तालुक्याचे नाव लौकिक केले तसेच लसीकरणात ही जिल्ह्यात आष्टी तालुक्याला प्रथम क्रमांक मिळवून दिला. आई वडील बीड येथे रुग्णालयात उपचार घेत असताना तसेच ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असताना आष्टी येथे घरी होम क्वारंटाईन रहाऊन आपली व कुटुंबातील सदस्यांची काळजी न घेता तालुक्यातील जनतेची काळजी घेत उत्कृष्टपणे काम सांभाळले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल जिल्ह्यातील अनेक अधिकारी सामाजिक संघटनांनी घेऊन त्यांना "कोरोना योद्धा" पुरस्कार देऊन अनेकदा गौरविण्यात आले. डॉ नितीन मोरे यांनी तालुक्यातील आरोग्य अधिकारी व  आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मराठवाड्यात आष्टीचे नाव लौकिक केले.

No comments