Breaking News

पाचशे गोरगरिबांना किराणाचे किटचे वाटप शकील ईनामदार व दलील ईनामदार यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

गौतम बचुटे । केज

कोरोना व्हायरस साथीचा रोग आणि लॉकडाऊनमुळे पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी खा. राजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शकील ईनामदार माजी सभापती पं. स. केज) व दलील ईनामदार (माजी उपनगराध्यक्ष) यांनी स्वखर्चाने  किराणा किटचे वाटप करत शहरातील गरीब ईदच्या सणाला मुकू नयेत म्हणून सुमारे 500 नागरिकांना किराणा किटचे वितरण केले.

 रमजान आपल्याला ईश्वर आणि ईशभयाची जाणीव तसेच इतर मानवांबद्दल सहानुभूती आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची शिकवण देतो. ईदच्या दिवशी आपल्याला हे धडे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे, असे शकीलभाई व दलीलभाई म्हणाले. एखादा उत्सव साजरा करत असताना, आपले शेजारी आणि लाखो प्रवासी कामगारांना भुकेले झोपायला भाग पडावे अशी परिस्थिती असू नये. ईदचे सार म्हणून आपण त्यांची काळजी घ्यायला हवी ही भावना मनात ठेवून संपूर्ण केज शहरातील गरिबांना किराणा सामान आणि ईदसाठी आवश्यक साहित्य खोबर, खारीक, काजू, बदाम, सेव, मनुके चारुळी, गोडेतेल, साखर, बेशन, गहू पीठ साबण, मेहंदी वाटप केले.

प्रत्येक ईद दिनी गरिबांना मदत मिळते. यावर्षी परिस्थिती त्यांच्यासाठी अधिक वाईट आहे. यावर्षी कोणी खरेदी करणार नाही म्हणून आपण आपल्या पैशाचा काही भाग गरजूंवर खर्च करावा, जेणेकरून जे त्यांच्या घरातच अडकुन राहिले आहेत ते उत्सव साजरा करू शकतील. ईद हा आनंदाचा सण आहे आणि कोणालाही या आनंदापासून वंचित ठेवले जाऊ नये.  

         दरम्यान उत्सवाच्या वेळी लोकांनी स्वतःच्या आरोग्याची विवेकबुद्धीने काळजी घेण्याचे आवाहनही समाज नेत्यांनी केले. अनावश्यक खरेदी करण्याचे टाळा आणि बचत करा, कारण परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आपल्या देशासह संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसचा त्रास होत आहे. दररोज शेकडो नवीन प्रकरणे समोर येत आहेत. आम्ही आपल्याला लॉकडाऊनचे अनुसरण करा, घरामध्येच राहा आणि शॉपिंगला जाऊ नका, असे आवाहनही दलील भाई व शकिलभाई इनामदार यांनी केले. 


No comments