Breaking News

नफा ना तोटा तत्त्वावर आधार कोव्हीड सेंटरचे आज उद्घाटन

उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती

आष्टी :  आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील बी.डी. हंबर्डे कॉलेज येथे दि. शनिवार दि 22 मे रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ना नफा ना तोटा या तत्त्वावर सर्वसामान्यांसाठी पन्नास बेडचे सुसज्ज सर्व सुविधायुक्त आधार कोव्हीड सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मा.आ.अमरसिंह पंडित, आ.प्रकाश सोळंके, आ.रोहित पवार, आ. संदीप क्षीरसागर, आ. यशवंत माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          कोरोना महामारीत सुरवातीपासून जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असलेलले आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली बी डी हंबर्डे कॉलेज येथे आधार कोव्हीड सेंटर सुरू करण्यात येत आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना उपचारासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालये कमी पडत आहेत. मतदारसंघातील जनतेला कोरोना उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये यासाठी आष्टी येथे ना नफा ना तोटा तत्त्वावर सर्व सामान्यांसाठी पन्नास बेडचे सुसज्ज सर्व सुविधायुक्त आधार कोव्हीड कोव्हीड सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याठिकाणी रुग्णांना अत्यंत अल्प दरात उपचार मिळणार आहे. याठिकाणी डॉ. अविनाश मुंडे, डॉ. प्रताप गायकवाड, डॉ. गणेश पिसाळ, डॉ. रामदास सानप, डॉ. प्रताप चौरे, डॉ शैलजा गर्जे, डॉ. नदीम शेख, डॉ. फिरोज तांबोळी आदी तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुगणांना उपचार दिले जाणार आहेत.

भविष्यातील धोक्यासाठी देखील सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. यामुळे आधार कोव्हीड सेंटर येथे भविष्यातील धोका ओळखून लहान मुलांचे तज्ञ डॉक्टर डॉ. रामदास सानप व डॉ. प्रताप चौरे यांच्या उपस्थितीत बाधित झालेल्या लहान मुलांना देखील उपचार दिले जाणार आहेत. 

No comments