Breaking News

काशीपीठ देणार अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण : श्री काशी जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी


कोल्हापुर : तीन राज्यांमध्ये अनाथ मुलांना काशीपीठाकडून उत्तम दर्जाचे शिक्षण, महाप्रसाद आणि राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना महामारीच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. आई वडिलांच्या मृत्यूमुळे अनेक मुले अनाथ झाली आहेत. या अनाथ मुलांना कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रामध्ये काशीपीठाकडून दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था होणार आहे असे काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.

कर्नाटक राज्यातील बिसनळ्ळी, तालुका शिग्गांव, जिल्हा हावेरी आणि गदगनगर येथे काशी पीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. येथे वेद, संस्कृत, योग, संगीताबरोबरच आधुनिक शिक्षणसुद्धा दिले जाते. तसेच महाराष्ट्रातील लातूर, तेलंगणामध्ये शादनगर या ठिकाणीसुद्धा काशी पीठाचे पारंपरिक गुरुकुल आहे. याही ठिकाणी आधुनिक शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. श्री काशी पीठाच्या सर्व गुरुकुलांमध्ये महाप्रसाद व उत्तम राहण्याची व्यवस्था आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा येथील अनाथ मुलांसाठी उत्तम निवास, महाप्रसाद व शिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अपेक्षित पालकांनी गुरुकुलच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा असे श्री काशी जगद्गुरु महास्वामीजी यांनी सर्वांना सूचित केले आहे. 

यापूर्वी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे कोविड सेंटरची स्थापना केली असून यामध्ये तीनशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. ही संतोषाची बाब आहे. ज्यांना गुरुकुलात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी पुढील व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

1. श्री गदिग्यप्पा मामले पट्टनशट्टर, बिसनळ्ळी गुरुकुल, मो.नं. 9113824678, 

2. मंजुनाथ बेलेरी गदग गुरुकुल, 9448027291,

3. मन्मथप्पा पंचाक्षरी, लातूर गुरुकुल, 9403542221

4. श्री. जगदेव हिरेमठ, शादनगर गुरुकुल 9246581653


No comments