Breaking News

कृषी पदवीधारक तरुण शेतकऱ्यांची यशोगाथा : साळेगावची बेळगाव पोपटी मिरची हैद्राबादच्या बाजारात


एक एकर ढोबळी मिरचीने केले 

गजानन इंगळे याला लखोपती !

गौतम बचुटे । केज

कृषि पदवी मिळाली पण नौकरीचे प्रयत्न सुरू आहेत. तो पर्यंत काय करायचे ? व्यवसाय करायचा झाला तर भांडवल कसे उभे करायचे? कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला तर तो चालेल की नाही? मग पुन्हा काय? असे डोक्यात अनंत प्रश्न घोळत असताना केज तालुक्यातील साळेगाव येथील अवघ्या पंचवीस वर्षे वयाच्या कृषि पदवीधर तरुणाने एक साहसी व धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे ऐन उन्हाळ्यात ढोबळी मिरची लागवडीचा ! असा हा तरुण गजानन इंगळे या तरुण शेतकऱ्यांची ही यशोगाथा.

केज तालुक्यातील साळेगाव येथील गजानन इंगळे हा कृषी पदवीधर तरुण. पदवी प्राप्त होताच एक नौकरी करण्याची इच्छा पण तो पर्यंत काय ? नौकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. तसेच आपल्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्यातून आपलेही अर्थार्जन करावे म्हणून दुसरा विचार केला की, किमान कृषि सेवा केंद्र सुरू करावे. पण त्याला भांडवल स्पर्धेत या व्यवसायातील प्रस्थापित यांच्यापुढे कसा निभाव लागणार? त्यात यशस्वी होऊ की नाही. असे अनेक प्रश्न होते. पण त्याच्यातील जिद्द आणि धडपड कमी होत नव्हती. मग त्याने एक वेगळाच मार्ग निवडला. तो म्हणजे आपली वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पीक न घेता आपल्या कृषी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरविले. 

परंतु कोरोनाच्या महामारीमुळे मागील वर्षां पासून बंद, संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे. तरी देखील त्याने हिम्मत दाखवून ऐन उन्हाळ्यात आपल्या एक एकर क्षेत्रावर बेळगाव पोपटी या वाणाची ढोबळी मिरची लागवडीचा निर्णय घेतला. त्या साठी त्याने जमीन तयार करून त्याला शेणखत, कंपोस्ट खत व इतर खतांचा बेसल डोस देऊन जमीन तयार केली. त्यावर पाच फूट अंतरावर बेड तयार करून ठिबक सिंचन व मल्चिंग केले. त्यात ५×१ अंतरावर ६ फेब्रुवारी रोजी लागवड केली. त्यासाठी त्याला १३००० रोपे लागली. त्याला ड्रीप द्वारे खत व औषध फवारणी केली. त्या नंतर लागवडी पासून ५० व्या दिवसा पासून मिरची बहरात आली आहे. आता पर्यंत ४ वेळा तोडणी केली आहे. आता पर्यंत सुमारे १२.५ टन एवढे उत्पन्न निघाले आहे. सध्या ही मिरची कलंबच्या व्यापाऱ्या मार्फत हैद्राबाद येथे विक्रीसाठी जात आहे. सध्या या मिरचीला सुमारे २० ते २२ हजार रु. टन भाव आहे. आता पर्यंत चार वेळा मिरचीची तोडणी झाली आहे त्यातून त्याला २ लाख ६० हजार रु उत्पन्न मिळाले आहे.

ही मिरची सुमारे ३५ ते ४० टनाच्या आसपास मिरचीचे उत्पन्न निघन्याची शक्यता आहे. आहे यातून सुमारे साडेसहा ते सात लाखाच्या आसपास उत्पन्न होण्याची खात्री आहे. यामुळे एक एकर शेतीत गजानन इंगळे याने एक एकर जमिनीत अवघ्या तीन महिन्यात सुमारे साडेसहा ते सात लाख रु चे उत्पन्न घेऊन नौकरी नाही आणि भांडवल नाही म्हणून बेकार तरुण समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मागील वर्षी मी अशाच प्रकारे शेवग्याचे उत्पन्न घेतले होते. त्यातून मी दिड लाख रु. चे उत्पन्न घेतले. त्यामुळे तरूणांनी नौकरी नाही म्हणून खचून न जाता पारंपरिक शेती ऐवजी जर आधुनिक पद्धतीने शेती केली आणि बाजारभावाचा अंदाज घेऊन लागवड केली तर निश्चित फायदा होतो.

         --- गजानन इंगळे 

               (B Sc Agri.)

"लॉक डाऊन मुळे आम्ही गजानन इंगळे याच्या शेतात एक महिन्या पासून कामाला आहोत त्या मजुरीतून आम्ही आमच्या कुटुंबाच्या रोजी रोटीचा प्रश्न भागविता आहोत."

     --- निलावती सरवदे, मजूर

खर्च :-

१) रोपे -- १५००० रु

२) मल्चिंग --- १५००० रु

३) बेसल डोस ----- १०००० रु.

४) फवारणी व अंतर मशागत --५०००० रु.

५) मजुरी ----  ३०००० रु

६) पेरणीपूर्व मशागत व इतर --- ३०००० रु.

--------------------------------------

एकूण खर्च :- १५०००० रु.

No comments