Breaking News

वशिल्या वर रेमडिसिविर विकणाऱ्याला वेशीला टांगु : अशोक रसाळ

बीड :  येथे वशिल्यावर वाढीव भावात रेमडिसिविर इंजेक्शन्स ची विक्री  करणाऱ्या विक्रेत्यांनी हा काळाबाजार थांबवला नाही तर त्या विक्रेत्यांना वेशीला टागल्या शिवाय सोडणार नाही असा ईशारा भाजपा ग्रामीण युवा नेते अशोक रसाळ यांनी दिला आहे. 


                सविस्तर वृत्त असे की ग्रामीण भागात जनता आधीच आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे अशातच कोवीडची लागन झाली तर आभाळ कोसळावे असे संकट येत आहे यातूनही स्वःता ला धीर देत दवाखान्यात दाखल होतात पण त्याना खरी अडचन येथे असणारे काळाबाजार करणारे रेमडीसीवर विक्रेते डॉक्टर विविध एजंट्स अक्षरशा ग्रामीण भागातील जनतेला या लोकांनी पीळुन पीळुन मरण यातना दवाखान्यात दिल्या आहेत.

या लोकांना धडा शिकवण्यासाठी ग्रामीण भागातील भाजपा कार्यकर्ते युवक शहरांमध्ये दाखल होऊन थेट दवाखान्यात जाऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा दिला आहे सत्ताधारी यांनी तर लाजच सोडली आहे त्यांच्या कार्यालयातून इंजेक्शन कोणाला द्यायची याचे फर्मान सुटते कमिशन वर हे सत्ताधारी इंजेक्शन पोहोच करतात यामध्ये विविध डॉक्टर्स विक्रेते यांचा दलाल म्हणून वापर चालला आहे कोवीड सारख्या भयानक विषाणूला टक्कर देतांना गोरगरिबांचे प्राण चाले आहेत ,आता हे ग्रामीण जनतेतील युवक सहन करणार नाहीत व रस्त्यावर उतरून अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा ईशारा भाजपा ग्रामीण युवा नेते अशोक रसाळ व ग्रामीण भाजपाचे कार्यकर्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

No comments