Breaking News

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे वयाची मुदत वाढ द्यावी

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

शिरुर का : कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून MPSC व अन्य नोकर भरतीच्या स्पर्धा परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अनेकांची वयोमर्यादा संपलेली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. विद्यार्थ्यावरील हा अन्याय असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वयोमर्यादेत दोन वर्षाची वाढ करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दीड वर्षांमध्ये MPSC व अन्य नोकर भरतीच्या स्पर्धात्मक होऊ शकल्या नाहीत. मात्र या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांची वयोमर्यादा आता संपणार आहे. अशा युवकांचे भविष्य अंधारात गेले असून  हे विद्यार्थी  नैराश्यात सापडलेली आहेत. या  विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व शासकीय भरती मधील सर्व आरक्षित व ओपन जागेच्या वयाची कालमर्यादा कोरोना काळामुळे  दोन वर्ष  वाढविण्यात यावी अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी करत ज्या विद्यार्थ्यांनी MPSC अन्य शासकीय नोकर भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी केली पण ते परीक्षा देऊ शकले नाहीत.

आशा विद्यार्थ्यांवर अन्याय न होता  त्यांना पुन्हा संधी मिळेल असे ही महबूब शेख यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांनी तात्काळ सदरील मागणीचा सकारात्मक विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात प्रयत्न करू असे आश्वासन शेख यांना दिलं. 

No comments