Breaking News

आता मोक्काट फिरणाऱ्यांची होणार अँटिजेन टेस्ट व दंडात्मक कारवाई !

गौतम बचुटे । केज

केज शहरातील मोक्कारांची संख्या कमी होण्या ऐवजी वाढत असल्याने नगर पंचायतीने चेक पोस्टवर आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार असून विनाकामाच्या हिंडफिऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात येणार आहे.

केज शहरातील आणि इतर गावाहून येणाऱ्या नागरिकांवर कडक लॉक डाउनचा परिणाम झालेला नाही. अनेकजण वेगवेगळी कारणे सांगून किंवा बहाणे दाखवून दुचाकी व इतर वाहनातून फिरत असतात. याला प्रतिबंध घालण्यासाठी याता नगर पंचायतीच्या वतीने शहरातील शिवाजी चौकातील चेकपोस्टवर पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच दंड देखील वसूल केला जाणार आहे. 

केज शहरात शिवाजी चौक आणि ज्यभवांनी चौकात पोलिसांचे चेक पोस्ट असून पोलीस व आरोग्य कर्मचारी यांच्या साहाय्याने रॅपिड अँटी जेन टेस्ट व दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ही मोहिम प्रभावीपणे राबविली तर निश्चित विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आळा बसेल आणि कोरोनाचा संसर्ग व प्रसार कमी होण्यास मदत होईल. ही कार्यवाही सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजे पर्यंत करण्यात येणार आहे.

No comments