Breaking News

युवा उद्योजक सुमेध सहस्त्रबुद्धे यांचा कोरोना नियमानुसार आदर्श पद्धतीने आष्टीत विवाह संपन्न

के. के. निकाळजे । आष्टी

आष्टी येथील जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांचे चिरंजीव आणि युवा उद्योजक इंजि.सुमेध सहस्त्रबुद्धे आणि बीड येथील अनुराधा भंडारी यांचा कोरोना नियमानुसार आयोजित अत्यंत साध्या आणि आदर्श पद्धतीने विवाह पार पडला.आज दुपारी आष्टी येथील मातोश्री विद्यानगर शिक्षक वसाहतीमध्ये निवासस्थानाच्या दारात छोटासा मंडप उभारून शास्त्रोक्त पद्धतीने मंगलमय वातावरणात कोवीड नियमावलीनुसार शारीरिक अंतर राखून २० प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह संपन्न झाला.

वधू आणि वराकडील मिळून २० जण प्रतिष्ठित उपस्थित होते.यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस उपस्थित होते.त्यांनी उपस्थित त्यांनी नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यासाठी शिक्षण महर्षी माजी आ.भीमसेन धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी जि.प.सदस्य रवींद्र ढोबळे,किशोरनाना हंबर्डे, पोलीस निरीक्षक सलीम पठाण,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,युवानेते जयदत्त धस,मोहनतात्या झांबरे,राजेश राऊत,शरद रेडेकर,प्रवीण पोकळे हे उपस्थित होते.

No comments