Breaking News

शिरूरमध्ये विना मास्क फिरणाऱ्या 637 जणांवर तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 72 दुकानदारांवर दंडात्मक करावाई

नगर पंचायतीने तब्बल 2 लाख 98 हजार 500 रुपयांचा महसूल केला शासनाच्या तिजोरीत जमा

 


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार  

कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढू लागल्याने बीड जिल्ह्यात सुमारे दोन महिन्यांपासून  संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक कारण असेल तरचं सकाळी ७ ते १० या वेळेत नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी मुभा आहे. मात्र घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. परंतु शिरूर कासार शहरात मात्र मास्कविना नागरिक हुंदडत असल्याने आजवर विना मास्क फिरणाऱ्या 637 जनावर तर नियम पायदळी तुडवून दुकाने खुली ठेवणाऱ्या दुकानदारांवर येथील नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. यातून शासनाला तब्बल 2 लाख 98 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने  वाढू लागल्यामुळे कडक निर्बंध लावले. मात्र तरी सुद्धा नागरिक विना मास्क अनावश्यक फेरफटका मारू लागले तर बंदमध्ये दुकानदार ही दुकाने उघडली जात असल्याचे दिसत असताना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सडक फिऱ्यांकडून १ लाख ९० हजार ५०० रुपयांचा आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ७२ दुकानदारांकडून १,०८,००० रुपये असा एकूण तब्बल २ लाख ९८  हजार ५०० रुपयांचा दंड नगर पंचायतीने वसूल केलाय. मात्र कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, म्हणून प्रशासन कडक भूमिका घेत वेळप्रसंगी  दंडात्मक कारवाई करीत आहे.  परंतु काही सडकफिरे व दुकानदार ही गंभीर बाब लक्षात घेत नसल्याचं पुन्हा पुन्हा शिरूर कासार शहरात दिसतंय.

No comments