Breaking News

विशाल कुलथे खून प्रकरणातील आरोपींना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

शिरूर कासार : शहरातील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून चौथ्या आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत घेण्यात येत आहे.

विशाल कुलथे या तरुण सराफा व्यापाऱ्याला जिजामाता चौकातील महाकाल या हेअर सलूनच्या दुकानात गळा दाबून मानेत कात्रीने खोपसून निर्घृणपणे खून केल्याची घटना 20 मे रोजी घडली होती.त्यानंतर प्रकरणातील मास्टरमाइंड असणारा आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड आणि त्याचे साथीदार धीरज मांडकर,केतन लोमटे यांनी सदरील मृतदेह मोटारसायकलवर नेऊन शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील शेतात पुरून टाकला होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसांच्या आत प्रकरणचा छडा लावत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.तर चौथा आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड अद्यापही फरार आहे.आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 


No comments