Breaking News

आ.संदिप भैय्यांच्या प्रयत्नातुन श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या रस्त्यासाठी 25 लाखाचा निधी

ढेकणमोहा : श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील मुख्य रस्ता खराब झाल्याने हा रस्ता तातडीने करण्यात यावा अशी मागणी या भागातील भाविकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्याकडे केली होती. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी या मागणीची दखल घेत जिल्हा वार्षिक योजनेतून 25 लाख रूपयाचा निधी बीड-परळी हायवे ते श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा करण्यासाठी दिला आहे. 

बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. आ.संदिप भैय्या ही नियमित गोरक्षनाथ टेकडीवर जावून आशिर्वाद घेतात. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या संस्थांच्या विकासाबाबत व परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले आहे. विविध योजनेमधून विकास निधी देण्याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या असून बीड-परळी हायवे ते श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी या मुख्य रस्त्यासाठी 25 लाख रूपयाचा निधी दिला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून सदर निधीला मंजुरी देण्यात आली असून याची प्रशासकीय मान्यता जिल्हा प्रशासन यांनी दिली आहे. लवकरच श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला जाणार असल्याने या भागातील नागरीकांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत. 

No comments