Breaking News

अॅड. शाहरुख पटेल यांनी पशुपक्षी प्राण्यांसाठी बांधले 24 तास पाणी राहणारे सिमेंट काँक्रीटचे तीन पाणवठे


पाटोदा : तालुक्यातील मौजे कारेगाव येथे पाण्या साठी भटकंती करणाऱ्या प्राण्यांची  ताहान भागवण्या साठी अॅड. शाहरुख पटेल यांनी पानवठ्याला छोटी पाईपलाईन करून नळ बसवून चोवीस तास बारामहिने पाणी राहणारे जीवंत पाणवठे तयार केले आहे .ह्या पाणवठ्या वर जंगल परिसरातील पशुपक्षी व प्राणी आपली तहान भागवतना दिसत आहे.उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा वाढत जातो, तसे वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडे पडतात. यामुळे वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होतात आणि मग पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळतात.


 असे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात, तर काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होतात. एखाद्‌दुसरा वन्यप्राणी आपला अधिवास सोडल्याने शिकाऱ्यांकडून शिकार होतो यासाठी या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी मिळावे व त्यांची पाण्यासाठी होणारे हाल व भटकंती थांबावी यासाठी पाणवठे तयार करण्याची मोहीम अॅड.पटेल यांनी हाती घेतली आहे. या हंगामात त्यांनी तीन पाणवठे तयार केले आहेत. पाणवठ्याच्या परिसरात अनेक दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ फुलपाखरे, खवले कोल्हे ,मांजरी, हरीण ,काळवीट, मोर,कावळे,ससे ,लांडगे, , असे अनेक पशुपक्षी प्राणी आपली तहान भागवतआहेत पुढील काळात ही आशा पद्धतीचे पाणवठे बांधून प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे,  असे अॅड. शाहरुख पटेल यांनी सांगितले.


No comments