Breaking News

शिरूरच्या कोव्हिड सेंटर मधून 22 रुग्णांनी ठोकली धूम !


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कोरोणाच्या सोम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांसाठी मुलींच्या शासकीय वसतिगृहात शासकीय कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे.

इथे सोम्य लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात मात्र गेल्या तीन दिवसात या कोव्हिड सेंटर मधून तब्बल 22 रुग्णांनी धूम ठोकली असल्यामुळे शिरूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ नये व कोरोणा रुग्ण संख्येत वाढ होऊ नये म्हणून या सेंटरचे व्यवस्थापक डॉ.राठोड यांनी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.

शोध घेऊन होणार कारवाई!

याविषयी पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पळून गेलेल्या कोरोणा रुग्णां विषयी आमच्याकडे आरोग्य विभागाचे पत्र आले आहे तरी या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

डिचार्ज होणार असतानाही काढला पळ!

पळून गेलेल्या 22 रुग्णांमध्ये काही रुग्णांचे डिचार्ज करण्यात येणार होते परंतु या रुग्णांनी कसल्याही प्रकारे कोऑपरेट न करता कोव्हिड सेंटर मधून पळ काढला आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भाग पडावे लागले आहे.

- डॉ.विजय राठोड- व्यवस्थापक - कोव्हिड केअर सेंटर,शिरूर कासार.

No comments