Breaking News

काळेगाव ह येथील जिओ जिंदगी व ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित अँटीजन कॅम्पला गावकऱ्यांच्या प्रतिसाद 100 तपासण्यात 5 जण निघाले पॉझिटिव्ह

बीड : जिओ जिंदगीच्या वतीने वेळीच निदान वेळीच उपचार या आदर्श कृतीतून कोरोनविरुद्ध लढाई सुरू केलेली आहे. बीड तालुक्यातील काळेगाव हवेली येथे जिओ जिंदगी, ग्रामपंचायत कार्यालय, काळेगाव व माणुसकीचा आधार ग्रुपच्या वतीने अँटीजन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. 100 अँटीजन तापसण्यांमध्ये 5 जण पॉझिटिव्ह निघाले त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.


यावेळी जिओ जिंदगीचे धनंजय गुंदेकर, अशोक येडे, ग्रामपंचायत काळेगाव सरपंच बाळकृष्ण चौरंगनाथ पवार, म्हाळसापूर सरपंच लहू खांडे, अंकुश राठोड, प्रकाश घोडके, प्रकाश गाडे, रणजित पवार, अविनाश गवळी, अण्णासाहेब डोके आदींची उपस्थिती होती. नाळवंडी आरोग्य केंद्राचे जांभे, आशा सेविका कानतोडे, राऊत आदींनी कँपच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments