Breaking News

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी--सुरेखा जाधव


बीड
: कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण जग मेटाकुटीला आलेले असताना आता आणखीन कोरोनाची तिसरी लाट येईल असे प्रशासन व शास्त्रज्ञ सांगत असून यापूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा ही भयानक लाट असल्याचे बोलले जात आहे. या पूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेमध्ये लाखो लोकांचे बळी जात असतानाच चित्र आपण रोज पाहत आहोत.यासाठी प्रशासन ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे आपण पाहत आहोत .परंतु या नंतर ही येणारी तिसरी लाट ही या पेक्षाही भयानक असल्या कारणानेे जनतेने आणि प्रशासनाने गाफील राहून चालणार नाही .

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं जास्त प्रमाणात दगावली जातील असे शत्रज्ञाचे मत आहे त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं झालं आहे .येणाऱ्या  काळात लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडू नये या करता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांनी लहान मुलांच्या डॉक्टरांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही दिल्या असल्या तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला खूप गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे.

कारण लहान मुलांना हा आजार लवकर सांगता ही येणार नाही आणि या आजाराची लक्षण ओळखणं सोपं ही नाही त्यामुळे ही कोरोनाची लाट इतर दोन लाटेपेक्षाही भयानक स्वरूपाची असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे हे नाकारून चालणार नाही त्यासाठी लागेल ते उपाययोजना प्रशासनाने वेळीच केली तर या येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपण सुरक्षित राहुन आपल्या राज्यातील जनता ही निरोगी ठेवण्याकरता सर्वोतोपरी प्रयत्न सरकारने करणे गरजेचे आहे .नसता  या लहान मुलांना कोरोनाच्या विळख्यातुन बाहेर काढणे सोपे नाही याची वेळीच दाखल प्रशासनाने घेऊन योग्य उपाययोजना करावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या  सुरेखा जाधव यांनी केले आहे. 

No comments