Breaking News

शेतकरी- कामगार विरोधी नव्या कायद्या विरोधात RMBKS मैदानात


राष्ट्रपतींना आजपासून पुढील चार दिवस काळ्या फिती लावून देशभरातून कर्मचारी  देणार निवेदन ;  RMBKS बीडजिल्हा शाखेची माहिती

बीड :  केंद्रातील  सरकारने संसदेत चर्चा न करता शेतकरी, कामगार हिताचे कायदे रद्द करून नवे कायदे शेतकरी कामगार विरोधी लागू केले असून या नव्या कायद्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने (RMBKS) लढा पुकारलाय. राष्ट्रपतींना RMBKS च्या वतीनं लवकरच काळयाफिती लावून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 

प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कामगारांच्या हिताचे जे 29 श्रम संहिता अधिनियम केंद्र सरकारद्वारे रद्द करण्यात आले. त्यांच्या जागी चार श्रम संहिता अधिनियम, संसदेमध्ये चर्चा न करता लागू करण्यात आले, तीन शेतकरी विरोधी कायदे , नवीन शैक्षणिक धोरण 2020 , सरकारी उद्योग आणि कंपनी खाजगीकरण करण्यासाठीचे कायदे आणि नवीन पेन्शन योजना या सर्व कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा ,भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा ,भारतीय बेरोजगार मोर्चा, यांच्या माध्यमातून देशातील 31 राज्यात , 550 जिल्हा  मुख्यालय , 5000 हजार तहसील मुख्यालय , केंद्र आणि राज्यातील वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी - विभागांमध्ये खाजगी उद्योग कंपनी विभागांमध्ये 19 एप्रिल 2021 ते 23 एप्रिल 2021 या काळामध्ये पाच दिवस काळी फीत लावून (कर्तव्यावर राहुन) लाखो कर्मचारी, अधिकारी आणि करोडो कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवा यांनी ( भारतीय संविधान कलम 19 च्या अनुसार आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशाला अनुसरून ) आंदोलन करण्यात आले होते. 

आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात  राष्ट्रपती महोदयांना भारत सरकार यांच्या नावे दिनांक 26 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात शेतकरी कामगार कायद्या विरोधात आणि जुनी पेन्शन योजना कायदा पूर्वलक्षी प्रभावाने कार्यान्वित करून केंद्र आणि राज्य कर्मचारी- अधिकारी यांना लागू करण्यासाठी तसेच पदोन्नतीतील आरक्षण, उच्च शिक्षणामध्ये आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून निवेदन देण्याचा कार्यक्रम संघटनेद्वारे निर्धारित करण्यात आला आहे.  केंद्रातील सरकार जनविरोधी कायद्याला खतपाणी घालत असून लोककल्याणकारी कायदे अंमलात आणावेत, यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आजपासून मैदानात उतरला असून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना RMBKS तर्फे देशातील 31 राज्यातून 550 जिल्हास्तरावरून आणि 5000 हजार तहसील मुख्यालयाच्या ठिकाणावरून निवेदन दिले जाणार असल्याचे संघाच्या  जिल्हा शाखेद्वारे पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. 


No comments