Breaking News

राजयोग फाउंडेशन तर्फे बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना N- 95 मास्क, सॅनिटायझरचे वाटप


पोलिसांच्या निरोगी आरोग्यासाठी राजयोगचा स्तुत्य उपक्रम

आशिष सवाई । बीड   

Covid 19 - महामारीची दुसरी लाटेत महाराष्ट्र सापडला असून कोरोनाच्या महासंकटात सुरुवातीपासून आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन पोलिस काम करत आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा उच्चांक वाढत असताना कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. संकटाच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या बीड पोलिसांना राजयोग फाउंडेशनच्या वतीनं   राजयोगचे शुभम धुत यांच्या हस्ते N-95 मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनापासुन बचावासाठी आवश्यक असलेल्या या छोट्याशा उपक्रमामुळे पोलिस बांधवांना कोरोनापासून बचाव होण्यास मदत होईल व त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल, अशी भावना राजयोग फाउंडेशनचे शुभम धुत यांनी यावेळी व्यक्त केली.

लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा प्रसार थांबवण्या बरोबरच सर्वसामान्य नागरिक जीवनावश्यक आणि गरजेच्या वस्तू व औषधींपासून वंचित राहू नये म्हणून आवश्यक ठिकाणी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. अहोरात्र सर्वांसाठी कार्यरत असणाऱ्या बीड शहरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दंगल नियंत्रण पथक, बीड शहर पोलीस ठाणे, शिवाजी नगर पोलीस ठाणे, पेठ बीड पोलीस ठाणे, बीड ग्रामीण पोलीस ठाणे, बीड शहर वाहतूक शाखेच्या पोलीस बांधवांना राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून N- 95 मास्क व सॅनिटायझर सर्व पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडे सोमवारी (दि.१९) सुपुर्द करण्यात आले. 

यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राऊत साहेब, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठोंबरे साहेब, बीड ग्रामीण चे निरीक्षक साबळे साहेब, बीड शहर वाहतूक शाखेचे चे निरीक्षक भारती साहेब, बीड शहर पोलीस ठाण्याचे अंधारे साहेब, पेठ बीड पोलीस ठाण्याचे बनकर साहेब, दत्ताभाऊ दुधाळ, राजुभाऊ गुळभिले, दंगल नियंत्रण पथकाचे प्रमुख सिद्धार्थ कुडुक, महावीर सोनवणे यांच्यासह  शैलेश नाईकवाडे, सागर वाहुळ, राजदीप धुत, प्रतिक झंवर, संकेत करवा, वैभव जाधव यांची उपस्थिती होती. 


No comments