Breaking News

केजमध्ये सरकारच्या निर्बंधाला झुगारून नागिकांचा मुक्त संचार

गौतम बचुटे । केज 

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ब्रेक दि चेन कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र केजमध्ये सरकारच्या निर्बंधाला झुगारून नागरिक मुक्तपणे संचार करताना शहरातील शिवाजी चौकात मंगळवारी दिसत होते. 

केज तालुक्यातील मस्साजोग, होळ, युसुफवडगाव, मांगवडगाव, उदरी, फुलेनगर येथे कोरोनाचा कहर वाढला असून स्थानिक प्रशासकीय अधिकारी तहसीलदार, पोलीस प्रशासन, नगरपंचायत विभाग आणि आरोग्य विभागाने नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये किंवा घरा बाहेर न पडण्याचे आवाहन वारंवार केलं जातं आहे. 

मात्र असं असतानाही नागरिक बेफिकिरपणे प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून शहरातील रस्त्यांवर वावरताना दिसत आहेत.  आत्ता नागरिकांनी कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य ओळखून स्वतःची व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर जावे अन्यथा  विनाकारण घराबाहेर पडू नये, शासन प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. 

No comments