Breaking News

सर्वांनी कोरोनाची अँटीजन टेस्ट करून घ्यावी --माजी सभापती कोकाटे


नेकनूर : सध्या महाराष्ट्राबरोबरच बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक जण कोरोना ची टेस्ट करायलाच घाबरत आहेत. त्याच्यामुळेच सध्या बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असून ही कोरोणा ची टेस्ट करून घेण्यासाठी प्रत्येकाने न घाबरता पुढे येऊन टेस्ट करून घ्यावी व आपल्या पासून आपल्या कुटुंबाला याचा प्रादुर्भाव होणार नाही ही काळजी घेण्याचे आवाहन बीड पंचायत समितीच्या माजी सभापती मनिषा ताई कोकाटे यांनी केले आहे.
     सध्या कोरोना चा प्रादुर्भाव खूप वाढत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कोरोना बद्दल भीती आहे आणि या भीतीपोटी बरेच जण कोरोणा ची टेस्ट करून घेण्यासाठी घाबरत असून कोणीही ही टेस्ट करून घ्यायला घाबरू नये. जर आपल्याला कोरोना चे काही लक्षणे आढळून आले तर प्रत्येकाने न घाबरता प्रशासनाने जि मोफत टेस्ट करून घेण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याचा फायदा घेऊन आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व यामधून आपल्या कुटुंबासह आपल्या गावाला वाचवावे. असे आवाहन शिवसंग्राम तथा आमदार विनायक  मेटे यांच्या वतीने पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा ताई कोकाटे व ज्ञानेश्वर कोकाटे यांनी स्वतः मांजरसुंभा  मध्ये येऊन कोरोना ची टेस्ट करून सर्व  नागरिकांना आवाहन केले आहे.

No comments