Breaking News

असंगाशी संग महागात पडले; जरी राजकारण गेलं चुलीत तरी व्हाट्स अप स्टेट्स कळ लावून गेले !


व्हॉटअप स्टेटसवर राजकारणाचे स्टेट्स भोवले : परस्परा विरुद्ध मारामारीच्या तक्रार दाखल

गौतम बचुटे । केज 

सोशल मिडियाचा वापर हा मााहितीचे आदानप्रदान करून त्याचा चांगला वापर करण्या ऐवजी एकमेकांना हिणविन्यासाठी तसेच चीड व द्वेष निर्माण करण्यासाठी केला तर त्याचे पर्यावसन हे हातघाईवर आल्याचची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली असून त्यावरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

केज तालुक्यातील जाधव जवळा येथे दि.८ एप्रिल गुरुवार रोजी दुपारी २:०० वाजता मनोहर गौतम जावळे आणि उत्तरेश्वर नारायण जावळे यांच्या दोन गटात मोबाईल व्हाट्सअपच्या स्टेटसवर एकमेकांना उद्धेशून राजकीय स्टेट्स ठेवल्याच्या कारणावरून हाणामारी झाली आहे. या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला एकमेकांच्या विरुद्ध परस्पर विरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

मनोहर गौतम जावळे यांच्या फिर्यादी वरून अभिनीत विठ्ठल जावळे, विठ्ठल नारायण जावळे आणि उत्तरेश्वर नारायण जावळे यांच्या विरुद्ध भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४ ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस जमादार दिनकर पुरी हे करीत आहेत. तर उत्तरेश्वर नारायण जावळे हे दिव्यांग असून त्यांच्या फिर्यादीवरून भीमा सुनील जावळे, अजय गौतम जावळे, मनोहर गौतम जावळे, रोहित बन्सी जावळे, रोहन डिगांबर जावळे या पाच जणांच्या विरुद्ध  भा. दं. वि. १३४, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ चे कलम ९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे करीत आहेत.

No comments